गावची मोठी समस्या हागणदारी
बापुसाहेब घोडेस्वार तालुका प्रतिनिधी जामखेड जि.अहमदनगर
जामखेड - साकत गाव स्वच्छ गाव व सुंदर गाव बनवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार योजना बनवत असते गाव सुंदर झाले पण अजूनही काही गावे हागणदारी मुक्त झाली नाहीत प्रमोद रामभाऊ मुरुमकर उद्योगपती यांनी स्वतः च्या खर्चातून जामखेड ते पाटोदा रोड हागणदारी मुक्तीसाठी पुढे सरसावले.
काल साकत गावी येथे रामभाऊ रामा मुरुमकर मा. वन कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद रामभाऊ मुरुमकर उद्योगपती यांनी नारळ फोडून हागणदारी मुक्तीसाठी सुरुवात केली व रोड स्वच्छ केला साकत गाव सुंदर गाव स्वच्छ गाव ठेवण्यासाठी स्व: त्याच्या खर्चातून जामखेड ते पाटोदा रोड वर शौचालयाला उघड्यावर बसतात येणारे जाणारे प्रवाशांना दुर्गंधी वासाचा सामना करावा लागत होता.
बर्याच वेळा भल्या पहाटे गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून गावात जागृती अभियान राबविण्यात आली होती लोकांना दंड करूनही तरीही त्या गुड मॉर्निंग पथकाला लोकांनी पाठ फिरवली. प्रत्येकाने घरोघरी शौचालय बांधुन हागणदारी मुक्त गाव केला पाहिजे. उघड्यावर शौचालयास बसू नये. जो उघड्यावर शौचालयास बसेल त्याला ग्रामपंचायतने दंड केला पाहिजे ग्रामपंचायतने ही गाव स्वच्छ ते साठी वेगवेगळे उपक्रम राबवून गाव स्वच्छ ठेवला पाहिजे असे ही ते म्हणाले.
वेळी राजेंद्र मुरुमकर, जनाबाई घोडेस्वार, प्रमिला घोडेस्वार, पुष्पाबाई घोडेस्वार, मोतीराम घोडेस्वार, सागर घोडेस्वार, सुमीत घोडेस्वार, उपस्थित होते.


0 टिप्पण्या