Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-मागील 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या ओबीसी वस्तीगृहाच्या प्रश्नावर चालढकल करत आधी 15 ऑगस्ट आणि आता जानेवारीत वसतिगृह सुरू करू अश्या खोट्या घोषणा ओबीसी मंत्री अधिवेशनात करत आहेत.

माजी अर्थमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे अर्थमंत्री श्री.अजित पवार  या दोन्ही ओबीसी विरोधी मंत्र्यांनी   72ओबीसी वसतिगृहे आणि 21600 विद्यार्थ्यांच्या आधार योजनेसाठी निधी न देवून खोळंबा केल्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन!
 व वरील निधी न मिळवू शकणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे या मंत्री महोदयांनी चालढकल करणं बंद करावे,गोलगोल उत्तरे देवू नये.
हतबलता सोडून काहीतरी ठोस करावा अन्यथा
 सरळसरळ राजीनामा द्यावा.

आजच्या हिवाळी अधिवेशनातील ओबीसी वसतिगृहे,आधार योजना, पदभरती याबाबतच्या प्रश्नांवर त्यांना काहीही ठोस सांगता आले नाही. 
इतकी हतबलता बरी नव्हे. नुसतं पदाला चिकटून काही अर्थ नाही. राजीनामा द्यावा.
संस्थापक अध्यक्ष संजय मते ,संयोजीका महिला अध्यक्ष शोभा बावणकर,संयोजक जीवन भजनकर,सुभाष बोरकर प.स सदस्य, मनोज पटले,सतिष सोनवणे, अलकेश ढबाले ,जितु पटले, प्रा.किरण मते सर्व शाळेतील प्राचार्य शिक्षक विध्यार्थ्यांने स्वतःच्या हाताने पोष्ठ आँफिस म्हधे जाऊन पोष्ठ कारठ पाढविण्यात आले यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा ग्रामीण भागातील पध्दीकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या