Ticker

6/recent/ticker-posts

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यानी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घातला घेराव

चित्रा न्युज प्रतिनिधी
 नाशिक: सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या विद्यार्थ्याने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून विविध समस्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना सादर केले. निवेदनात खालील मागण्याचा समावेश होता.

मागण्या खालील प्रमाणे :-

१) युनिट क्र. ३ येथील २०२१-२२ वर्षातील स्टेशनरी प्राधान्य क्रमाने वितरीत करण्यात यावे .

२) प्रलंबित निर्वाह मासिक भत्ते, ड्रेसकोड, स्टेशनरी व इतर थकीत असलेले भत्ते एकाच वेळी तात्काळ वितरीत करण्यात यावे.

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ मुलींचे शासकीय वसतिगृह व नासर्डी पुलाजवळील मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींचे प्रलंबित सर्व निर्वाह भत्ते स्टेशनरी भत्ते वितरीत करण्यात यावे.

४) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील सर्व युनिटचे स्टेशनरी व जुने, गुणवंत युनिटचे भत्ते त्वरित वितरीत करण्यात यावे.

५) शासकीय GR दि. २६ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार देण्यात येणारे विविध भत्त्यामध्ये महागाई नुसार वाढ करण्यात यावा .

६) शासकीय GR. दि. २६ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या सुविधा यांची योग्यरित्या अमलबजावणी करावी.

७) MAHADBT ची थकीत असलेली शिष्यवृत्ती लवकर वर्ग करावा. ८) वसतिगृहात अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तरी पाण्याचे प्युरीफायर मशीन तात्काळ बसवावे .

        निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व  मुलींचे वसतिगृहाचे निर्वाह भत्ते, स्टेशनरी वितरीत करावे व MAHADBT शिष्यवृत्ती, वाढत्या महागाईप्रमाणे भत्यात वाढ करण्यात यावी अश्या प्रमुख मागण्या चा समावेश होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या