चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर:-मध्ये राज्यातील पत्रकारांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने साखळी उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकारी यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री यांनी सर्व मागण्या मंजूर करू असे आश्वासन दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचना करीत मंत्री शंभूराजे देसाई, आ. संजय गायकवाड यांच्या समितीच्या माध्यमातून सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या.
या बैठकीस अनिल म्हस्के प्रदेश अध्यक्ष ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, दिव्या भोसले राष्ट्रीय महासचिव, मंगेश खाटिक विदर्भ अध्यक्ष, आनंद आंबेकर राज्य उपाध्यक्ष, जितेंद्र चोरडिया शहर कार्याध्यक्ष चंद्रपूर, किशोर कारंजेकर, जिल्हा अध्यक्ष वर्धा, राजेश सोनटक्के विदर्भ संघटक, सचिन धानकुटे तालुका अध्यक्ष सेलू,नरेंद्र देशमुख विदर्भ उपाध्यक्ष, एकनाथ चौधरी जिल्हा सचिव वर्धा, कृष्णा सपकाळ जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बुलढाणा यांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या