Ticker

6/recent/ticker-posts

लाखनीत १८९३ विद्यार्थी देणार १२वी ची परीक्षा

• १० परीक्षा केंद्राची व्यवस्था 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324

भंडारा:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर चे वतीने २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होणाऱ्या इयत्ता १२वी चे परीक्षेत लाखनी तालुक्यातून १ हजार ८९३ विद्यार्थी बसणार आहेत. त्यात ९८९ विद्यार्थी तर ८१४ विद्यार्थिनी चा समावेश आहे. या करिता १० परीक्षा केंद्र ठरविण्यात आलेले आहेत. परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पडावी. या करिता तालुका दक्षता समिती, भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच परीक्षा केंद्र परिसरात धारा १४४ लागू राहणार आहे. 
          लाखनी तालुक्यात २५ कनिष्ठ महाविद्यालय असून शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता बारावीत १ हजार ८९३ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये बुधवार(ता.२१) रोजी सुरू झालेल्या इयत्ता १२वी च्या परीक्षेकरिता निर्धनराव वाघाये पाटील कनिष्ठ महाविद्यालय माडगी, गोविंद ज्युनिअर कॉलेज पालांदूर, समर्थ महाविद्यालय लाखनी, जिल्हा परिषद गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय लाखनी, निर्धनराव पाटील वाघाये ज्युनिअर कॉलेज लाखनी, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव/सडक, निर्धनराव वाघाये पाटील ज्युनिअर कॉलेज मुंडीपार/सडक, सिद्धार्थ ज्युनिअर कॉलेज सावरी/मुरमाडी, निर्धनराव वाघाये पाटील ज्युनिअर कॉलेज रेंगोळा, राष्ट्रमाता इंदिरा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तूप. ह्या १० परीक्षा केंद्रावर १८९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा काळात परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ लागू राहणार आहे. कॉपी मुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची आणि महसूल विभागाची  भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त राहणार असल्याने भयमुक्त वातावरणात सुरळीत परीक्षा पार पडणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या