जि.प.सदस्या विद्या कुंभरे यांचे प्रतिपादन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो.95459 14324
भंडारा :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एका जाती, धर्माचे नव्हते तर सर्वांचे होते. अठरा पगड जातींना एकत्र करून जनतेचे स्वराज्य उभे केले ते खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहेत. असे जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्या शिवनगरी ले आऊट लाखनी येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
शिव स्मारक समिती शिवनगरी लेआऊट लाखनी येथे त्री दिवशीय शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे, मुख्य मार्गदर्शक प्राचार्य दिगंबर कापसे, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर, नगरसेवक प्रदीप तितिरमारे, माजी सरपंच यमुताई गायधनी, ऍड. होमेश्वर रोकडे, विचार पिठावर उपस्थित होते. अश्वस्वार छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला माल्यार्पण, दिप प्रज्वलन, शिवगर्जना व शिवआरती ने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांचे प्रमाणेच दैनंदिन जीवनात आचरणाचे उपस्थितांना आवाहन केले.
त्रीदिवसीय शिव जन्मोत्सवात क्रीडा, कला, बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना शिवपूजक प्रवीण शेलार यांचे हस्ते, प्रशासकिय अधिकारी गुंजन फेंडर यांचे अध्यक्षतेखाली, क्षेत्र सहाय्यक सुनील वैद्य, सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव इसापुरे, समितीचे अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे, विनोद गायधनी, यशवंत कानतोडे यांचे प्रमुख उपस्थित पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ओ.रा. शेंडे, प्रास्ताविक उमेश सिंगनजुडे तर आभार धनपाल हुकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिव स्मारक समितीचे उपाध्यक्ष राजकुमार खोब्रागडे, सचिव जगदीश धांडे, कोषाध्यक्ष किशोर धरमसारे, सदस्य विनोद बांते, नारद गिरेपुंजे, मुकेश लांबकाने, विकास गायधनी, ज्ञानेश्वर येळेकर, रुपेश नागलवाडे, राजू बडवाईक, रितेश लांडगे, नीलकंठ येवले, नंदू वालुरकर, सुरेंद्र सिंगनजुडे, सुधीर कुंभरे, स्मिता सिंगनजुडे, अर्चना बांते, अर्चना कमाने, रजनी धांडे, नोबिना बडवाईक, रसिका धरमसारे, दिपाली काशीकर, तनुजा काशीकर, प्रमिला लांबकाने, रजनी हुकरे, योगिता खोब्रागडे, नविता गायधनी, येळेकर मॅडम, बांडेबुचे मॅडम, शेंडे मॅडम, येवले मॅडम, मोहतुरे मॅडम, करंजेकर मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या