Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी येथे राष्ट्रीय बॅंक सुरु करा , जनतेची मागणी .....

 
विठ्ठल पाटील लातूर 

लातूर :-उदगीर तालुक्यात सर्वात मोठे आणि गुरांच्या बाजारासाठी देशात सुप्रसिध्द  असलेल्या हंडरगुळी या गावात एक सुध्दा राष्ट्रीय बॅंक (उदा: एचडीएफसी एक्सीस,बीओआय,एसबीआय ) नाहीत.तसेच अशी एखादी राष्ट्रीय बॅंक येथे असावी,यासाठी एकाही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मेहनत घेत नसल्याने येथे अशी बॅंक अद्यापही सुरु झाली नाही.खरोखरच राष्ट्रीय बॅंकेची गरज असुन,संबंधित वरिष्ठ अधिका-यानी या भागातील हजारो ग्राहकांची गरज लक्षात घेऊन येथे त्वरीत राष्ट्रीय बॅंकेची स्थापना करावी अशी हाळीसह परिसरातील जनतेची मागणी आहे..
नांदेड-बिदर राज्यमार्गालगत असलेले हंडरगुळी हे गाव गुरांच्या आठवडी बाजारासाठी देशाच्या कानाकोप-या- मध्ये सुप्रसिध्द असल्याने येथे बाजार हंगामात देशभरातुन तसेच आरवाडी बाजारहट करण्यासाठी परिसरातुन हजारो लोकं ये-जा करतात.यापैकी अनेकांना मोठी रक्कम ठेवण्यासाठी व अन्य कामांसाठी राष्ट्रीयक्रत बॅंकेचे अकाॅंऊट असणे गरजेचे आहे.तसेच बहूतांश व्यक्तींना होमलोन व बिजनेस लोन याकरिता तसेच बचत गटासाठी एचडीएफसी,अॅक्सीस यासारख्या बॅंकेत खाते असायला पाहीजे.असे संबंधित म्हणतात.माञ येथे अशी बॅंक नसल्याने खाते नाही. व ज्या लोकांचे आहे,त्यांना अकाऊॅॅंट काढण्यासाठी उदगीरला अनेकवेळा येरजा-या कराव्या लागल्या आहेत.
तेंव्हा या भागातील लोकांची गरज स्थानिक लोकप्रतिनिधींनी ओळखुन हंडरगुळी येथे एकातरी राष्ट्रीय बॅंकेची शाखा सुरु करण्यासाठी मेहनत घ्यावी.व संबंधित अधिका-यानी येथे त्वरीत बॅंक सुरु करावी.अशी हाळी व परिसरातील जनतेची मागणी आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या