मित्राला तत्काळ अटक
राकेश आसोले चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर :-अल्लड वयातल्या मैत्रीतून २५ वर्षीय तरुणाने १७ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. त्याच्या धमक्यांना घाबरून मुलीने हा प्रकार कुटुंबापासून लपवला. मात्र, प्रकृतीत बदल होऊन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी सागर दाभाडे (रा. इंदिरानगर, गारखेडा) याच्यावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचाराअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सागरने तिला बीड बायपासवरील हिवाळे लॉन्स येथे बोलावून अत्याचार केले. तरुणीची प्रकृती बिघडल्याने कुटुंबाने तिला रुग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. तरुणीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी तत्काळ सागरला अटक केली. सागर एका रुग्णालयात नोकरी करतो.
असे ओढले जाळ्यात
गारखेड्यात राहणाऱ्या मुलीची मित्रांच्या माध्यमातून ऑक्टोबर, २०२२ मध्ये सागरसोबत ओळख झाली. सागरने बोलणे वाढवून प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केले. सतत अत्याचारामुळे मुलीने नंतर त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.


0 टिप्पण्या