आज प्रत्येक फुले शाहू आंबेडकरी व संविधानवादी युवा, नागरीक तसेच निस्वार्थवृत्तीने झटणाऱ्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून...
अनोंमदर्शी तायडे
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प किंवा आ. बाळासाहेबांचा आदेश समजून आपण कामाला लागायला पाहिजे..
इथपर्यंत आम्ही, ज्यांनी कधी आमची किंमत केली नाही. त्याला मतदान केलं. त्याच्यासाठी उन्हातान्हात फिरलो. परंतु त्यांनी कधीच आम्हाला सन्मान दिला नाही. मान दिला नाही. तरीसुद्धा आम्ही त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत.
परंतु आता कमीत कमी आपल्या स्वतःसाठी, संविधानासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी तरी मैदानात उतरला पाहिजे.
आपल्या आजूबाजूची आठ ते दहा खेडे हे प्रत्येकाने पिंजून काढले पाहिजे असं मला वाटते..
मी व्यक्तिगत रित्या जखमी अवस्थेत असल्यानंतर सुद्धा प्रचारासाठी बाहेर पडत आहे. मला भावनिक साद आपणास घालायची नाही....
माझ्या प्रती तशा भावनाही तुमच्या नकोत.
परंतु आपल्या हातात फक्त मोजून पाच दिवस बाकी आहेत, हे पाच दिवस जर आपण घरात बसून राहिलो तर येणारी पाच वर्ष किंवा येणारी अनेक वर्ष आम्ही गुलामगिरीकडे वाटचाल करू.
… आणि हे वाटचाल करत असताना त्यात माझाही खारीचा वाटा होता, आणि म्हणूनच आम्ही गुलाम झालो. अशी म्हणण्याची वेळ माझ्यावरती येऊ नये.
आणि माझ्या मुलाने माझ्याकडे सन्मानानेच पाहावे.
यासाठी मला तरी एवढ्या बिकट कंडिशन मध्ये सुद्धा घरात बसावेसे वाटत नाही. त्यामुळे मी आजच सावदा येथे प्रचार रॅलीमध्ये स्वतः सहभाग नोंदवला आणि वंचित प्रचार केला.
आपणही आपली जबाबदारी समजून बाहेर पडा .....
अभी नही तो कभी नही...
आपण प्रस्थापित नाही, आपण धनदांडगे नाहीत, आपल्याकडे संसाधन नाहीत...
परंतु आपल्याकडे एक बाब नक्की आहे.
प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास आणि बाळासाहेबांचा स्वाभिमान आणि बाबासाहेबांच संविधान यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडा आणि वंचित ला जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी पाच दिवस द्या.
जयभीम..!
आपलाच
अनोंमदर्शी तायडे


0 टिप्पण्या