रुपाली मेश्राम चित्रा न्युज
अकोला :-१० मे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा वाढदिवस म्हणजेच स्वाभिमान दिवस' निमित्त वंचित बहुजन युवा आघाडी
अकोला जिल्हा कार्यकारिणी ने युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या प्रमूख उपस्थित सामाजिक उपक्रमाने साजरा केला.
यामध्ये मातोश्री वृद्धाश्रम
(शिवापुर) दुपारी येथे भोजन दान करण्यात आले,सूर्योदय बालगृह
मलकापूर येथे लहान मुलांसाठी केक कापून शालेय साहित्य वाटप संध्याकाळी करण्यात आले, तसेच श्री राज राजेश्वर मंदिर येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या दीर्घायुष्यासाठी
महाआरती करण्यात आली
आणि शिवली बुद्ध विहार (भिम नगर) येथे वंदना सुत्र पठण करुन तथागत गौतम बुद्ध,डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पुजन करून "स्वाभिमान दिवस"
सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत वंचित युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे ,विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, ओबीसी नेते ऍड संतोष रहाटे,
शहर संघटक निलेश देव, युवा आघडी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत माणिकराव घोगरे,महासचिव राजकुमार दामोदर,
पुर्व महानगर अध्यक्ष वैभव खडसे,
दादाराव पवार, भारत निकोसे, सचिन शिराळे,जय रामा तायडे, ऍड.सुबोध डोंगरे,आनंद खंडारे, कृष्णा देवकुनबी,ऍड मीनल मेंढे, पुर्व महानगर महासचिव रितेश यादव, अमोल जामनिक,रक्षक जाधव आकाश जंजाळ,सूरज दामोदर, आकाश सं. गवई,नागेश उमाळे, सचिन डोंगरे, आशिष सोनोने, राजेश बोदडे,नम्रता आठवले, सोनिया कांबळे, तेजस्विनी बागडे, सिमा गवई, नंदिनी ढोरे, रोहित खंडारे, निखिल गजभिये,रत्नपाल डोंगरे उपस्थित होते.


0 टिप्पण्या