विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-हाळी-हंडरगुळी गतवर्षी सा.बां.खात्याने काढलेल्या जागेवर व नव्याने बांधलेल्या नालीवर तसेच जि.प.शाळेच्या जुन्या मेन गेट पुढे विनापरवाना माॅंस विक्रेत्यांनी पुन्हा मोठ्याप्रमाणात अतिक्रण केले आहे.तसेच या रोड लगतच हातगाडे व त्यांचे कॅरेट्स व टेबल,खुर्ची आदी साहित्य रोडलगतच ठेवतात.यामुळे नांदेड-बिदर अंतरराज्य मार्ग हा अरुंद होऊन धोकादायक बनला असुन , या बद्दल आवाज उठवुन सुध्दा याकडे लक्ष देण्याऐवजी सा.बां.खात्याचे सं. अधिकारी हे अर्थकारण करण्यात गुंग झाल्याने येथे अतिक्रमण परत थाटले आहे.असा सुर ऐकू येत आहे.
तेंव्हा शाळा सुरु होण्यापुर्वी जिल्हा परिषद शाळेपुढील अतिक्रमित जागे वरील अवैध व नियमबाह्य होणारी माॅंस विक्री सेंटर्स व अन्य अतिक्रमन हटवावेत,अन्यथा कांही सामाजिक संघटना मोठे जन आंदोलन करणारच असा इषारा पप्पु पाटील यांनी दिला..
याची थोडक्यात माहिती अशी की,या 2 गावातुन गेलेल्या अंतरराज्य मार्गा लगत अतिक्रमण वाढल्याची बातमी या पेपरातुन येताच सा.बां.खात्याने 2023 मध्ये ते काढुन दुतर्फा नाली बांधली.माञ पुन्हा त्याच लोकांनी तेथेच अतिक्रमन करुन हा राज्यमार्ग धोकादायक बनविला आहे.अशी माहिती तेंव्हा एका पञकाराने देताच तत्कालीन आयपीएस/दबंग पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी येथे भेट दिली असता i.p.s निकेतन कदम यांच्या धाकामुळे व हाबाड्यास घाबरुन सगळ्यांनी आपापले सगळे अतिक्रमन झटपट काढुन घेतले होते. पण कदम साहेबांची बढतीवर बदली होताच पुन्हा त्याच लोकांनी सर्वञ पुर्वीपेक्षाही मोठ्याप्रमाणत रोडटच अतिक्रमण केले.व याला संबंधित सा.बां.खाते अर्थपुर्ण असे खतपाणी घालुन दुर्लक्ष करीत असल्याचा सुर ऐकू येत आहे.म्हणुन विद्यमान i.p.s. *जाॅंबाज*पोलिस अधिकारी बी.सी. रेड्डी यांनी पाहणी करुन एन.बी.कदम साहेबांसारखी बेधडक व दणकेबाज अशी कारवाही करावी,अशी मागणी जनतेतर्फे पप्पु पाटील यांनी केली आहे.तसेच याबाबत सा.बां.खात्यानी व जि.प./ पं.स. शिक्षण खात्याने शाळा सुरु होण्यापुर्वी"अॅ क्शन" घ्यावे , अन्यथा विविध संघटना व युवावर्ग जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहे.असा इषारा पप्पु पाटील यांनी दिला आहे.....


0 टिप्पण्या