Ticker

6/recent/ticker-posts

निलेश लंकेच्या प्रचारार्थ जामखेडच्या पदाधिकाऱ्याचा व कार्यकर्त्यांचा घर ते घर प्रचार जोमाने सुरू....


सुजित धनवे चित्रा न्युज 
जामखेड :-  प्रचारासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचविण्यासाठी उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी ‘घर ते घर’ प्रचाराचा वेग वाढविला आहे.आज रोजी जामखेड शहरातील मोरे वस्ति,शिक्षक काॅलनी,विद्या काॅलनी, संताजी नगर, शिवाजी नगर,दत्त नगर येथे निलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर टू घर प्रचार केला.
      यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रकाश सदाफुले, शहाजी राळेभात,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे,आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा, नगरसेवक मोहन पवार,अमित जाधव, संभाजी राळेभात,महेंद्र राळेभात, प्रशांत राळेभात, प्राचार्य विकी घायतडक, प्रविण उगले,अजय भोसले,वसीम सय्यद, कुंडल राळेभात, रमेश आजबे, मिनीनाथ लटके,महेश राळेभात, अमोल लोहकरे, सचिन शिंदे, संदीप गायकवाड, बाबासाहेब मगर,अक्षय खिळे,राम बाबर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
     आघाडीचे निलेश लंके आणि महा युतीचे  उमेदवार डॉ सुजय विखे या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असल्याने चुरस वाढली आहे. ती प्रचारातही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या