प्रभाग क्रमांक ८ लाखांदूर येथील घटना
पोलिसांत गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- क्षुल्लक कारणावरून पत्नी व मुलांनी संगनमताने इसमाशी भांडण करून जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी(ता.२१मे) रोजी ९:०० वाजता प्रभाग क्रमांक ८ लाखांदूर येथे घडली. जखमी मुरलीधर तुकाराम गायकवाड(५८) यांच्या फिर्यादीवरून लाखांदूर पोलिसांनी पत्नी वनिता मुरलीधर गायकवाड(५५) मुलगा शुभम मुरलीधर गायकवाड(२८) व विशाल मुरलीधर गायकवाड(२५) यांचे विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
दोन दिवसांआधी यातील फिर्यादी मुरलीधर गायकवाड एका खासगी विवाह तथा स्वागत समारंभाकरिता एकटेच गेले होते. आप्तस्टांनी तिथे पत्नी का आली नाही. अशी विचारणा केली असता पत्नीची प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगून त्यांनी वेळ मारून नेली होती. बुधवारी विवाह समारंभात तू खोटे का सांगितलास असे म्हणून पत्नी व दोन्ही मुलांनी मुरलीधर गायकवाड यांचेशी भांडण करुन ढकलढुकल केले. तथा खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे मुरलीधर च्या उजव्या व डाव्या हाताच्या बोटाला मार लागून रक्तस्त्राव झाला. तसेच पत्नी व मुलाने पुन्हा मारण्याची धमकी दिल्याने जखमी पती मुरलीधर गायकवाड यांचे फिर्यादी वरून लाखांदूर पोलिसांनी पत्नी व दोन्ही मुलांवर विविध कलामान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे


0 टिप्पण्या