शेताच्या बांधावर पुरस्कार प्रदान
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- प्रगतिशील धान उत्पादक शेतकरी द्रोपद चरणदास धारगावे यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा 2024 चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी(ता.23मे) रोजी शेताच्या बांधावर सपत्नीक प्रदान करण्यात आला. यावेळी युवा समाजसेवी नितीन कुंभलकर, ग्रामगीताचार्य पौर्णिमा सवाई, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे तसेच राजीव गांधी कृषि विज्ञान प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश दादा साबळे यांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन प्रदान करण्यात आले. धान उत्पादक शेतकरी द्रोपद धारगावे यांनी तांदळाच्या नवीन जातीचे भरघोस उत्पादन घेऊन झाडी पट्ट्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढावी. या करिता गावासह आजूबाजूचे गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे बाम्हानी आणि परिसरात धान उत्पादनात वाढ झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी राजीव गांधी प्रतिष्ठानचे सदस्य राहुल तायडे, ऐनुल्ला खान, सुनील सावळे, दत्ताभाऊ किटुकले, निलेश उभाड, कमल साखरे, अक्षय साबळे, सौरभ कोहळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या