• मेंढा/पोहरा येथील घटना, पोलिसांत अमासमत मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- हाती धरत्या मुलीने आजाराला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा मनावर परिणाम झाल्याने आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मेंढा/पोहरा येथे शुक्रवारी(ता.२४) सकाळी ८:०० ते ११:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे पतीचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतक महिलेचे नाव जिजा गौरीशंकर दोनोडे(४३) रा. मेंढा/पोहरा, तालुका लाखनी असे आहे. पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
मृतक जिजा हीची १६ ते १७ वर्षे वयाच्या मुलीने २ ते ३ महिन्यापूर्वी आजारास कंटाळून विष प्राशन करून मृत्यू पावल्याने आई जिजा हिने मनावर परिणाम घेऊन शुक्रवारी सकाळी आपले राहत्या घराचे पाठीमागील बाथरूम मध्ये स्लॅब च्या हुकाला काळ्या-पांढऱ्या लेस ने बांधून गळफास घेऊन मरण पावल्याचे उघडकीस आल्याने पोलिस पाटील वर्षा गेडाम यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, पोलिस हवालदार सुभाष राठोड, महिला पोलिस हवालदार प्रभा कुलसुंगे, पोलिस शिपाई राजू बडवाईक, चालक पोलिस शिपाई स्वप्नील कहालकर घटनास्थळी पोहचले. नातेवाईकांचे मदतीने मृतदेह खाली उतरवून सर्व सोपस्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. मृतकाचे पती गौरीशंकर दोनोडे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत तिचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिगंबर तलमले सीआरपीसी १७४ नुसार तपास करीत असून मन मिळावू जिजाच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या