• उपसभापती गिरीश बावनकुळे यांचे आवाहन
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- सिंचनाअभावी उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विकास साधता येत नाही. याकरिता शासनाने अनुसूचित जाती जमातीच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर योजना आणली आहे. यात ग्रामपंचायत स्तरावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची निवड करणे आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने प्रस्ताव पाठवून सिंचन विहीर योजनेचा लाभ घ्यावा. असे लाखनी पंचायत समितीचे उपसभापती गिरीश बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
शासनाने अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत नवीन सिंचन विहीर बांधकाम पॅकेज करिता कृषी विभागाच्या योजनांची महाडीबिटी पोर्टलद्वारे अमलबजावणी करावयाची आहे. त्याकरिता http://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ असून यावर शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरून आवश्यक प्रतिसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. आलेल्या प्रस्तावातून लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांनी सिंचन विहिरीकरिता प्रस्ताव दाखल करावे. असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती गिरीश बावनकुळे यांनी केले आहे.
ही आहेत आवश्यक कागदपत्रे
(१) जमिनीचा गाव नमुना ८अ, सर्व कोरडवाहू गटाचे सात बारे व नकाशा, (२) सक्षम प्राधिकाऱ्याचे १ लाख ५० हजार रुपयाचे आत उत्पन्नाचे प्रमाणपत्र, (३) सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, (४) सात बारा वर अधिक नाव असल्यास १०० रुपयाचे स्टॅम्प पेपर वर संमती पत्र, (५) अर्जदाराचे आधार कार्ड ची झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, बँक खाते आधार लिंक केलेले असावे, (६) ग्रामपंचायत ठरावाची सत्यप्रत व अर्ज ऑनलाईन केल्याची प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत.


0 टिप्पण्या