Ticker

6/recent/ticker-posts

दोन ट्रक ची समोरासमोर धडक, ५ गंभीर जखमी

• अशोक लेलँड समोरील महामार्गावरील घटना 

• लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने व लापरवाहीने ट्रक चालवून समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने ५ इसम जखमी झाल्याची घटना रविवार(ता.५) मध्यरात्री दरम्यान अशोक लेलँड कंपनी समोरील महामार्गावर उघडकीस आली. पोलिस हवालदार निलेश रामटेके यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून जखमींची नावे नेहाल प्रेमसिंह ठाकूर(२७), प्रताब ग्यानीराम निसाद(२४) दोघेही रा. नागपूर, केशव पारधी(३५) रा. राजनांदगाव, चंद्रकांत साकेत(२१), श्रावणकुमार साकेत(२८) दोघेही रा. रीवा(मध्य प्रदेश) अशी आहेत. पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
                महिला पोलिस हवालदार प्रभा कुलसुंगे, पोलिस हवालदार निलेश रामटेके हे पोलिस ठाणे लाखनी येथे तैनातीस असून शनिवारी रात्री ८:०० वाजता पासून ते रात्रकालीन कर्तव्यावर हजर असताना स्टेशन डायरी अंमलदार पोलिस हवालदार सुरेश आत्राम यांनी अशोक लेलँड कंपनी समोर २ ट्रकचा अपघात झाल्याची माहिती दिली. माहिती वरून महिला पोलीस हवालदार कुलसुंगे, पोलिस हवालदार निलेश रामटेके व पोलिस नायक जीपगाडी ने घटनास्थळी गेले असता अशोक लेलँड कंपनी समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) डांबरी रस्त्यावर ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल १०८९ आणि ट्रक क्रमांक सीजी ०७ सीके ९३१३ यामध्ये समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रक चे कॅबिन चेंदामेंदा झाले होते. ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल १०८९ मध्ये अडकून असलेले चालक नेहाल ठाकूर, प्रताब निसाद, केशव पारधी यांना घटनास्थळावरील लोकांच्या मदतीने कॅबिन बाहेर काढून १०८ अँब्युलन्स ने उपचाराकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. तसेच ट्रक क्रमांक सीजी ०७ सीके ९३१३ मध्ये अडकलेले श्रावणकुमार साकेत व चंद्रकांत साकेत यांनाही लोकांच्या मदतीने बाहेर काढून उपचाराकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. घटनास्थळाचे निरीक्षण केले असता ट्रक क्रमांक सीजी ०७ सीके ९३१३ चा चालक श्रावणकुमार साकेत याने आपल्या ताब्यातील ट्रक हयगयीने भरधाव वेगाने व लापरवाहीने चुकीच्या बाजूने ट्रक चालवून समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल १०८९ ला समोरासमोर धडक मारून स्वतःसह ५ इसमांना गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाल्याचे चौकशी अहवालावरून तथा पोलिस हवालदार निलेश रामटेके यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी ट्रक चालक श्रावणकुमार साकेत याचे विरुद्ध अपराध क्रमांक १८२/२०२४ कलम २७९, ३३८ भादवी तथा मोटारवाहन कायदा सहकलम ४/१२२, १७७(ए), १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात महिला पोलिस हवालदार प्रभा कुलसुंगे तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या