Ticker

6/recent/ticker-posts

दुचाकीला रानडुक्कराची धडक, १ जखमी

• मांढळ येथील घटना 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- उन्हाळी धान पिकास पाणी देण्यासाठी रात्रीचे सुमारास दुचाकीने शेतशिवारात जात असलेल्या शेतकऱ्याला रानडुक्कराने धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना शुक्रवारी(ता.३) रात्री ९:३० वाजता दरम्यान घडली. जखमी शेतकऱ्याचे नाव संजय माधव भुरले(३२) रा. मांढळ, तालुका लाखांदूर असे आहे. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. वन अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेऊन विचारपूस केली. 
                 संजय भुरले हे अत्यल्प भूधारक शेतकरी असून त्यांनी ०.८० आर मध्ये उन्हाळी हंगामात धान पिकाची लागवड केली आहे. सध्या धान परिपक्व होण्याचे मार्गावर असल्याने पाण्याची आवश्यकता असल्यामुळे ते शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धानाला पाणी देण्यासाठी दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने रस्ता क्रॉस करणाऱ्या रानडुक्कराने दुचाकीला धडक दिली असता. संजय भुरले रस्त्यावर कोसळल्याने रानडुक्कराने त्यांचेवर पुन्हा हल्ला चढविला. त्यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे नागरिक मदतीला धावून आले व त्यांनी रानडुक्कराला हुसकावून लावले. तथा जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दाखला करण्यात आले असून घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावीत यांना देण्यात आली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. मांढळ आणि परिसरात रानडुक्कराच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याच्या घटनात वाढ होत असून रात्रीचे वेळी दुचाकी चालावितांना सावधानता बाळगण्याचे आवाहन लाखांदूर वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या