Ticker

6/recent/ticker-posts

ओळखी करुण शारिरीक संबंध प्रस्थापित करुण पिडीतेवर अत्याचार पोलिस स्टेशन बलात्काराचा गुन्हां दाखल.



रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
नागपूर  :-नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिरपूर गावातील कुर्सी कंपनीच्या मागे असलेल्या वीट भट्टीलगत शेतात एका 18 वर्षीय तरुणीवर बळजबरीने झालेल्या लैंगिक अत्याचारात पीडित तरुणी गर्भवती झाल्याची घटना उघडकीस आली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी 18 वर्षीय तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून नराधम आरोपी निरंजन उर्फ अर्जुन माहूरे वय 23 वर्षे रा धारगाव, पावनगाव तालुका कामठी विरुद्ध कलम 376 पोक्सो कायदा 2012 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेने सुरु आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पसार आरोपीने सदर पिडीत तरुणीशी ओळख करून ऑक्टोबर 2023 ते डीसेंबर 2023 दरम्यान सदर घटनास्थळी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडित तरुणी गर्भवती झाली. यासंदर्भात पिडीत 18 वर्षीय तरुणीने नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पीडितेची वैद्यकीय तपासणी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर सदर आरोपी याला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येत त्याला शोधण्यास पोलिस चमु रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या