विजय चौडेकर चित्रा न्युज
बार्हाळी -: एका दुचाकी वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्राक्टरच्या ट्रालीला धडक दिल्याने यात पति, पत्नीसह,५, वर्षीय चिमुकला ठार झाल्याची दुर्दैवी घटना नांदेड,बिदर राष्ट्रीय महामार्ग १६१ अ रस्त्यावर बिहारीपुर जवळ दुपारी दोन च्या सूमारास घडली,
नांदेड तालुक्यातील नवीन वस्ती परतपूर गनी कुटुंब आपल्या दुचाकीवरून मूखेड ते बार्हाळी मार्गे गावाकडे जात होते, बिहारीपुर शिवारात येतांच रोडच्या कडेला उभे असलेल्या ट्राक्टरच्या ट्रालीला जोराची धडक दिली, या अपघातात शेख मोसीन अब्दुल गणी साब वय (३०) पत्नी फरिदा मोसीन शेख (२८) जागीच ठार झाले,तर पाच वर्षीय जुनेद या मूलाला उपचारासाठी उदगीर येथे घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला मात्र अज्ञात वाहनाने दुचाकी ला पाठिमागुन धडक दिल्याने दुचाकी ट्रालिवर आदळली असा काही जण अंदाज करत आहेत,या वेळी बघ्याची गर्दी जमली होती, सदरील घटनेची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनास कळताच मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सपोनि भालचंद्र तिडके यांनी आपल्या ताफ्यासह घटना स्थळी धाव घेऊन,
घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले,पुढील तपास करीत आहेत,


0 टिप्पण्या