Ticker

6/recent/ticker-posts

समता सैनिक दल आर्वी तालुका संघटकपदी दिनेश आढाऊ यांची नियुक्ती

अर्पित वाहाणे चित्रा न्यूज                          

वर्धा :-आर्वी लॉर्ड बुद्धा ऑफिस संविधान चौक (जुने बस स्टॅन्ड )यवतमाळ येथे संपन्न झालेल्या  समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र राज्य तथा विदर्भ कार्यकारणीच्या संयुक्त अशा सर्वसाधारण बैठकीत  दिनेश आढाऊ सर यांची समता सैनिक  दलाच्या  आर्वी तालुका संघटकपदी  निवड करण्यात आली.त्यांची नियुक्ती समता सैनिक  दलाचे महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल प्रा. अनिकेत ऊबाळे यांनी  केली. त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.सदर नियुक्ती ही दिनेश आढाऊ सर यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी  केल्याबद्दल करण्यात आली .या वेळी ईतरही जिल्हा व राज्यातील मार्शल्सच्या नियुक्त्या करण्यात आल्या व त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.                                    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक प्रा.अनिकेत उबाळे सर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून स.सै.दल महाराष्ट्र राज्याचे बौद्धिक प्रमुख नरेश ताकसांडे, महाराष्ट्र राज्य महिला विंग संघटिका पूनमताई ढाले, महाराष्ट्र राज्य महिला विंग सहसंघटिका डॉ. कल्पनाताई दातार' विदर्भ संघटक सुनील मेश्राम, भास्कर कांबळे,विलास नरांजे,डॉ .ढाले
हे  प्रामुख्याने उपस्थित होते.या प्रसंगी मान्यवरांनी संघटनात्मक विविध विषयांवर मार्गदर्शन केले.                       नियुक्ती झाल्याबद्दल स.सै.दल महाराष्ट्र राज्य संघटक अनिकेत उबाळे ,महाराष्ट्र राज्य बौद्धिक प्रमुख नरेश ताकसांडे ,महाराष्ट्र राज्य वुमन्स रेजिमेंन्ट पुनमताई ढाले, महाराष्ट्र राज्य वुमन्स रेजिमेन्ट सहसंघटिका डॉ. कल्पनाताई दातार, विदर्भ संघटक सुनील मेश्राम ,वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे , वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपजी कांबळे यांचे आभार मानले.                                                त्यांचे तालुका  मार्शल संघटक मनोज थुल,चंदु भगत,पप्पु पाटील,आमोल ताकसांडे,अर्पित वाहाणे,प्रफुल काळबांडे,भारती बन्सोड,अविनाश कोल्हे,प्रीती आष्टेकर, अजीत पवार इत्यादींनी  आभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश ताकसांडे यांनी केले. तर सुत्रसंचालन यवतमाळ  स.सै.दल जिल्हा संघटक अशोक खरतडे यांनी केले व तर ऊपस्थितांचे आभार पुनमताई ढाले यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता शरणातेने करण्यात आली महाराणा प्रताब  वार्ड शाखा संघटक मार्शल अर्पित वाहाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या