Ticker

6/recent/ticker-posts

आरटीओ अधिकाऱ्याची दुसऱ्या अधिकाऱ्यास भर रस्त्यावरच बेदम मारहाण; देवाण घेवाणीवरून दोघात राडा..! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


परिवहन निरीक्षक विजयसिंह राठोड सह पाच जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल..!

 श्रीकांत बारहाते हिंगोली 

नांदेड :येथील परिवहन प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यात तुंबळ हाणामारी झाली. हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या चक्क शहराच्या मोर चौक परीसर भागात घडला.सहायक परिवहन निरीक्षकास परिवहन निरीक्षकाने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन दुसऱ्या अधिकाऱ्यास जबर मारहाण केली.

सहा महिन्यापूर्वी नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुजू झालेले सुदर्शन वसंतराव देवढे वय वर्ष 27 राहणार यश नगरी युनिट दोन काबरा नगर नांदेड यांना त्यांचे वरिष्ठ मोटार वाहन‌ निरीक्षक विजयसिंह राठोड हे मागील काही दिवसापासून सतत त्रास देत होते, 25 मे रोजी देवढे यांना फोन वरुन त्यांनी धमकी दिली.मी लोकल चा आहे माझा दोन तालुक्यात संपर्क आहे. माझी या परिसर भागात चलती आहे. त्यामुळे मी सांगेल त्या गाड्या सोडायच्या तसे जर केले नाहीस तर तुला मी पाहून घेईल.अशी धमकी त्यानी दिल्याची पोलीस ठाण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले गेले आहे.तसेच माझे या परिसरात खूप मित्र ओळखीचे आहेत, आणि या भागात ते‌ वाहने चालवत असतात. त्यांच्या गाड्यांचे कागदपत्र तपासायचे नाहीत, असा दम ही त्यांनी फोन वरती दिला. गाड्या कडून मिळणाऱ्या गाड्याकडून मिळणाऱ्या देवाणघेवाणी वरून त्यांनी हे सर्व केल्याचे सांगण्यत येत‌ आहे. 
त्यानंतर काही वेळाने पुन्हा धमकीचा फोन केला,आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता  व्हाट्सअप कॉल करून तुला भेटायचे आहे, माझ्या लग्नाचा वाढदिवस आहेे,तू मला शुभेच्छा देणार नाही का? असे त्यांनी व्हाट्सअप कॉल करून सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन असल्याने मी नक्कीच तुम्हाला विश करायला येईल, असे देवढे यांनी सांगितले. फिर्यादीत पुढे देवढे यांनी म्हटले आहे की, त्यानंतर रात्री आठ वाजता विजय राठोड यांनी मला मोर चौकात बोलावून घेतलं. मोर चौकात ते दिसत नसल्याने मी छत्रपती चौकात गेलो.परत त्यांचा फोन आला मी मोर चौकामध्ये कार पार्किंग मध्ये लाईट लावून थांबलो आहे.लवकर ये असे म्हणून त्यांनी मला बोलावून घेतले.मोर चौकात आल्यानंतर विजयसिंह राठोड व त्यांच्या इतर चार अनोळखी साथीदारांनी मला बेदम मारहाण केली.खाली पाडून लाथा  बुक्यांनी मारहाण केली एवढेच नाही तर विजयसिंह राठोड यांनी याचा माज उतरायचा आहे. म्हणून एका साथीदाराला गाडीतून चाकू आणण्यासाठी सांगितलं आणी चाकुने माझ्या गळ्यावर ठेवला.या वेळी मी झटका देऊन यातुन सावरलो.माञ या पाच जणांन‌ पैकी एकाने माझ्या गळ्याततील दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरली असल्याचे देवढे यांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे.

मारहाण करताना राठोड यांनी त्या सतिशलाही सांग त्याच्या ही कुटूंबा सहीत कार्यक्रम करीन आणि तुला तर आता च संपवतो, तुझी फॅमिलीच गायब करतो. अशी अशीलिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जवळपास 70 हजारांची रूपयांची दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरुन घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी घडलेला प्रकार मी माझ्या मिञ सतिश संभाजी भोसले यांना फोन करुन सांगितले, आणि हा प्रकार वरिष्ठ अधिकारी यांना ही सांगू न अखेर भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दाखल केली.

या फिर्यादीवरून मोटार परिवहन निरीक्षक विजयसिंह राठोड आणी त्याचे इतर चार या त्याच्या साथीदारांन विरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर-223/24 कलम 143,147,148,149,379,294,323,504,506, दोन भादवीसह कलम चार 25 शत्र अधिनियम अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक श्री चिटमपल्ले करत आहेत. विजयसिंह राठोड सध्या फरार असल्याचे पोलीसांनी सांगितले.एकंदर आधीच बदनाम असलेले आरटीओ कार्यालयातील खाबूगिरी या प्रकाराने 
चव्हाटावर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या