Ticker

6/recent/ticker-posts

अधिकारी व गुत्तेदार बनले टक्केवारी चे धनी.म्हणुन रस्ते झाले बकाल तर अधिकारी झाले मालामाल..!. डांबर नाही तर डांबरीकरण कसे चर्चा


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-हाळी व हंडरगुळी भागात असलेले सर्व रस्ते हे अत्यंत खराब झाले असल्याने याची सचिञ बातमी या पेपरातुन अनेकदा देण्यात आली.यामुळे शिरुर ताजबंद ते उदगीर जाणा-या रोड दुरुस्तीचे काम हे गत कांही महिण्यापुर्वी झाले आहे.पण सुकणी ता.उदगीर या गावाजवळ असलेले हजारो खड्डे न बुजविता या डांबर नसलेल्या रोडचे काम बंद का केले आहे.व जे काम झाले त्यात डांबराचे प्रमाण खुपच कमी दिसतेय म्हणुन बनवलेला हा डांबरी रस्ता पुन्हा खड्याचा बनतोय.म्हणुन मागचे पाठ पुढचे सपाट.अशा प्रकारे हा रोड बनला असुन यात संबंधित अधिका-यांनी मशीनच्या साह्याने या रोडचा दर्जा कसा.चांगला का बोगस. याची तपासणी केली नाही.व संबंधीत अधिकारी व गुत्तेदार यांची चांगलीच युती असल्याने गुत्तेदार व अधिकारी हे टक्केवारीचे धनी बनल्याने सुकणी जवळ हा रोड बकाल दिसत आहे.तर अधिकारी व गुत्तेदार हे मालामाल बनत आहे.अशी चर्चा या रोडवरुन ये-जा करणारे वाह णधारकांसह प्रवाशी करत आहेत..     
तसेच दुरुस्त केलेल्या रोडवर डांबर हवे तसेश्रदिसत नाही.म्हणुन दुरुस्त केलेला हा रोड लवकरच पुन्हा खड्याचा बनु शकतो. डांबर नाहीातर डांबरीकरण कसे?याचा इमानदारीने शोध घेऊन कारवाई करायाची हिंम्मत सं.अधिका-यांत नाही.म्हणुनच असे बोगस रस्ते ह्या भागात बनत असल्याचे चिञ आहे..    व याबाबत सर्व कांही माहीती असुन सुध्दा या भागाचे लोकप्रतिनिधी थंड, गप्पगार का?असा प्रश्न चर्चीला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या