विठ्ठल पाटील लातूर
लातूर :- एखाद्या राज्यातील गाड्या भारतात कुठे पण गेल्यातरी त्या ठिकाणच्या ट्रॅफीक पोलीस व आरटीओ यांना ओळखता यावा म्हणुन सर्व गाड्यांचे नंबर प्लेट इंग्रजीत असावेत.असा मोटार वाहन कायदा 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनयम 1989 या प्रमाणे हा कायदा अस्तित्वात आला असलातरी हा कायदा गेला "तेल लावत" असेच जणू कांही वाहनधारक म्हणतात की, काय?असा सवाल उपस्थित होतो.व याचे कारण म्हणजे या गावात आणि परिसरातील कांही बाईक्सचे नंबर हे फॅन्सी आहेत.तर कांही वाहणांच्या पुढे,मागे पोलीस-प्रेस असे लिहलेले दिसुन येते.घरातल्यांना पोलीसांचे पो व प्रेस चे प म्हणजे काय.याची काडी एवढी पण माहिती नाही.तरीही कांही वाहणांवर प्रेस व पोलिस हे एकदम ठळक अक्षरात लिहलेले दिसते.अण् यावर कारवाई करणारी यंञणाच या तालुक्यात अस्तित्वात नाही.म्हणुनच असे लिहून बेफाम व बिनधास्तपणे शेकडो गाड्या धावतात.व अशा गाडी मधून "गैर कानुनी" धंदे होऊ शकतात व सध्या गणेश उत्सवाची धूम सर्वञ सुरु आहे.तेंव्हा अशा वाहणांची योग्य व प्रामाणिकपणे तपासणी केल्यास अनेक गुपीते उघड होऊ शकतात.व तसेच कांही गुन्हेगारही सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कायद्या नुसार इंग्रजीतच नंबर हवेत.तरीही या गावात परिसरात शेकडो वाहणे असे आहेत.की ज्यांचे नंबर फॅन्सी आहेत. तसेच घरात पोलीस व पञकार कुणी पण नसतानाही अनेक वाहणांवर पोलीस व प्रेस असे लिहलेले दिसते.व संबंधित यंञणेला का दिसत नाही. का अशी कोणती यंञणाच उदगीर तालुक्यात विशेषत:हाळी परिसरात अस्तित्वात नाही.म्हणुनच रियल नंबर लिहण्याऐवजी नको ते लिहतात.अण् अशा वाहणधारकांकडचे वाहन हे चोरी चे पण असू शकते.तसेच गैर कामांसाठी ही अशा वाहणांचा वापर होऊ शकतो.म्हणुन गणेश उत्सवावर नको त्या संकटाचे विघ्न येऊ शकते. तेंव्हा आरटीओ सह संबंधितांनी अशा फॅन्सी व प्रेस,पोलीस तसेच कधी पांढरा तर कधी पिवळ्या रंगाची नंबर प्लेट लावणा-या चार चाकी कार व फटाका सायलंसर असलेल्या सर्व वाहणांची तपासणी करुन कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.व अशी कारवाई करणार कोण?असा सवाल हाळी परिसरात चर्चीला जात आहे...


0 टिप्पण्या