Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा

 
अर्पित वाहाणे चित्रा न्युज 
 
अकोला:- जिल्हात कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवत.१९४२ साली परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे शेडूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केले.त्याकाळी व-हाड प्रांतिक शेडूल्ड कास्ट फेडरेशनची पहिली परिषद ९ आणि १० डिसेंबर १९४५ ला अकोलयात संपन्न झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोल्यात आले होते.शेडूल्ड कास्ट फेडरेशन ने अकोला लोकसभा निवडणूकीत १९५२ साली व बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाना नंतर १९५७ च्या निवडणूकीत दुसऱ्या आणि तिस-या क्रमांकाची मते घेतली होती.१९०१ सालच्या जनगणनेत अकोला - वाशीम संयुक्त जिल्ह्यात बौद्ध धर्मीय म्हणून शून्य नोंद होती.१९५६ साली बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती. रिपब्लीकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ झाली.रिपब्लीकन पक्षाच्या प्रेसेडीयमची बैठक देखील अकोल्यात संपन्न झाली होती.१९५७ च्या निवडणूकीत रिपब्लीकन पक्षाला लोकसभेत ५ जागा व विधानसभेत १३ जागांवर विजय मिळाला होता.१९६४ ला पक्ष फुटला गटबाजी मुळे अकोल्यातील कार्यकर्ते  देखील विभागले आणि ताकदवान पक्ष कमकुवत बनला. १९७१ आणि १९७७ च्या निवडणूकीत अकोला लोकसभेत कोणत्याही आंबेडकरी गटाचा अधिकृत उमेदवार नव्हता.विधानसभेत मात्र रिपाइं उमेदवारांना दुस-या, तिस-या क्रमांकाची मते मिळत होती. गटबाजी होती मतदार मात्र कायम होता.त्या काळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे कार्य जिल्ह्यात मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील आठ वेळा अकोला जिल्ह्याचा दौरा केला होता.
 अश्या वातावरणात बाळासाहेबांचे अकोल्यात पहिल्यांदा आगमन झाले ते १४ ऑगस्ट १९८० रोजी. अकोल्यातील रेल्वे स्टेशन नजीकच्या सर्किट हाऊस येथे रूम नंबर तीन मध्ये ते उतरले होते. नगर परिषदेत आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे,शंकरराव रगडे, रामरावजी गवई, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील, जानराव इंगळे, भाऊसाहेब इंगळे ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली. सभेसाठी वेळ देण्याची मागणी केली.साहेबांचा होकार घेऊन रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभा ठरविण्यात आली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातू भिम नगर मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थात त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे दिनबंधु गुरुजी ह्यांचे अध्यक्षतेखाली प्रचंड गर्दीत संपन्न झाली.त्याआधी मोठी मिरवणूक काढण्यात आली होती.या दोन सभा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर आयोजित केली.
अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या त्यांचे सोबत लंकेश्वर गुरुजी, सुखदेवराव जाधव बुलडाणा, सुखदेव आठवले, नामदेव शिरसाट, कृष्णा इंगळे, नागपुर, रामकृष्णजी रजाने, जळगाव जामोद, विश्वनाथ पी. दांडगे, खामगांव, व्ही. एम. भोजने, नामदेवराव दाभाडे, एन. बी. वानखडे वडाळी, डॉ. बि. जी. थोरात, अंथोनी तेलगोटे, लहुजी तेलगोटे, गुरुजी अकोट, दिनबंधु गुरुजी, भाऊसाहेब इंगळे, अकोला जिल्हाभर फिरुन धम्माचा प्रचार केला. पायी इशारा मोर्चा नाशिक ते मुंबई काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला.राजगृह हिंदु कॉलनी मुंबई येथे समाजातील निवडक नेत्याची बैठकीत हे ठरवले गेले.ह्यावेळी राजाभाऊ ढाले, नामदेव ढसाळ, प्रा. अरुण कांबळे, जोगेंद्र कवाडे या नेत्यांशी चर्चा करण्यात आली. नंतर काळाराम मंदिर सत्याग्रहाचे स्मृतिदिनी दि. २ मार्च १९८३ पासुन पायी इशारा मोर्चा काढावा आणि समाजाचे अनेक प्रश्न सोडवावे असे ठरले. त्या कामी आंदोलनाचे नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी करावे असे ठरविण्यात आले आणि  संपूर्ण राज्यातुन जनता आली पाहिजे म्हणून प्रचार करण्यात आला. त्यावेळी अनेक निष्ठावान  जनता जागृत व प्रामाणिक लोक  राजा ढाले, मुंबई, एल. डी. भोसले, मुरलीधर जाधव मुंबई, जयदेव गायकवाड, पुणे, श्रीधरराव जाधव, मुंबई, सुखदेव जाधव, बुलडाणा, एम. एन. लंकेश्वर गुरुजी, अकोला, चंदन तेलंग यवतमाळ, जगन वंजारी, दादा इंगळे, जयश्री इंगळे, चंद्रपुर, दादा पाईकराव उमरखेड, रामकृष्ण रजाने जळगाव जामोद अनेक मंडळी राज्यात फिरत होती. त्याचा प्रचार अकोला जिल्ह्यात अनेक तालुका मेळावे घेवून केल्या गेला.बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला त्या गावात जाण्याकरिता अकोला जिल्ह्यातुन तुफान उपस्थिती होती. रेल्वेच्या टपावर तीन हजार लोक गेले होते. पायी मोर्चाला सुरुवात झाली. हा हा म्हणता गर्दी वाढली नेता 
पाच भीम सैनिकांनी केले १० दिवस आमरण उपोषण

अकोला येथील अशोक वाटिका सर्व आंदोलनाची साक्षीदार आहे दिनबंधु गुरुजी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या