Ticker

6/recent/ticker-posts

जि.प. गांधी कनिष्ठ महाविद्यालय लाखणी चा निकाल १०० टक्के


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर द्वारा नुकताच इयत्ता १२वी चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात जिल्हा परिषद गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय लाखणी चा निकाल १०० टक्के लागला असून या कनिष्ठ महाविद्यालयाने या वर्षीही आपली निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये २३८ विद्यार्थी इयत्ता १२वीच्या परीक्षेला बसले होते. प्रथम श्रेणीत २९, द्वितीय श्रेणीत १६६ तर बाकी विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. महेश सुनील वाघाये(७२.१७%) प्रथम, तेजस आसाराम सार्वे(७२%) द्वितीय तर मिथीलेश देवेंद्र कच्छवाय(७१.६७%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा परिषद गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात दारिद्र्य रेषेखालील गरीब व शेतकरी कुटुंबातील पाल्य शिक्षण घेत असतात. प्राचार्य रवी मेश्राम यांच्या सातत्यपूर्ण नियोजनामुळे या वर्षीही शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून या शाळेने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार व कौतुक करण्यात आले. यावेळी प्रा. आय.बी. चव्हाण, प्रा. मोहन फुंडे, प्रा. के.एम. वैद्य, प्रा. रजत गायधनी, शशी शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य रवी मेश्राम, शाळा समिती पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षीकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या