Ticker

6/recent/ticker-posts

केवळ एका मेसेजवर घाटीत दाखल नातलगांची माहिती घरबसल्या मिळवा

रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-घाटी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णाच्या प्रकृतीविषयी, दिल्या जात असलेल्या औषधांविषयी माहिती आता त्याच्या नातलगांना एका मेसेजवर समजणार आहे. घाटी प्रशासनाने यासाठी एका व्हॉट्सअॅप क्रमांकाची सुविधा कार्यान्वित केली आहे. त्यावर नातेवाइकांनी रुग्णाचे संपूर्ण नाव व दाखल वॉर्ड क्रमांक पाठवून विचारणा करावी. त्यानंतर कर्तव्यावर हजर निवासी डॉक्टरांना सदर वॉर्डमधून रुग्णाची माहिती घेऊन त्यांना कळवणे बंधनकारक असेल. शुक्रवारी वैद्यकीय अधीक्षक दालनात डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

मराठवाडा, खान्देशातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येतात. १,१७७ खाटांच्या रुग्णालयात प्रतिदिवस दीड हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेतात. उपचारांसाठी दाखल रुग्णासोबत एका नातेवाइकाला थांबण्यासाठी परवानगी आहे. मात्र, बहुतांश वेळेला ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांकडे मोबाईल उपलब्ध नसतो. काही कारणास्तव बंद झाल्यानंतर दूर असलेल्या नातेवाइकांना त्यांच्या प्रकृतीविषयी तत्काळ माहिती उपलब्ध न झाल्याने चिंता वाटते. येथे यावे लागते.

यामुळे घाटी प्रशासनाने सर्व रुग्णांच्या नातेवाइकांसाठी एका मेसेजवर रुग्णालयाच्या प्रकृतीविषयी माहिती उपलब्ध करून देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रसाद देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. मारोती लिंगायत यांची उपस्थिती होती.

कसा कराल मेसेज सुरू ?

डॉ. सुक्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाइकांनी ९२७२१०२४२७ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर केवळ मेसेज करायचा आहे. त्यात रुग्णाचे संपूर्ण नाव, वय व दाखल वॉर्ड क्रमांकाचा उल्लेख करावा.

त्यानंतर उपस्थित डॉक्टर सदर वॉर्डातून रुग्णावर सुरु असलेले उपचार, प्रकृतीची सद्यस्थिती व काही आवश्यक औषधांची गरज असल्यास त्याबाबत कळवले जाईल.

• २४ तास ही सेवा सुरू राहील. भविष्यात विभागनिहाय ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही सुक्रे यांनी स्पष्ट केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या