भंडारा :-मराठी चित्रपट "संघर्ष योद्धा मनोज जरांगे" मध्ये नायक जरांगे पाटील ची दमदार भूमिका रोहन पाटील यांनी तर जरांगे पाटील च्या एक संघर्षशील पत्नी ची आव्हानात्मक भूमिका भंडारा येथील सुरभी हांडे यांनी साकारली आहे.या चित्रपटात संदीप पाठक,सागर कारंडे,अरबाज शेख,मोहन जोशी, नाळ चित्रपट फेम श्रीनिवास पोकळे,संजय कुलकर्णी,माधवी जुवेकर,विजय मिश्रा,विनीत भोंडे,सुनील गोडबोले ई नी ही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.चित्रपटाचे लेखक व निर्माते गोवर्धन दोलताडे हे असून दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांचे आहे.
एका लढवैय्या कार्यकर्त्याच लढ़वैय्या पत्नी च्या भूमिका करणाऱ्या सुरभी हांडे यांचे जन्म भंडारा येथे झाले.त्यांचे आजोबा स्व.सुधाकर हांडे यांचा भंडारा येथे वाडा असून त्यांचे वडील श्री संजय हांडे हे संगीत क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्त्व आहेत,ते आमगाव येथे नोकरीला होते नंतर ते जळगाव येथे स्थायिक झाले,तिथे आकाशवाणी ला म्यूजिक कंपोजर म्हणून काम केले आणि नंतर सेवानिवृत्त झाले.यांचे मोठे बंधु स्व.सारंग हांडे भंडारा येथे जे.के.शाळे मध्ये संगीत शिक्षक होते ,लहान भाउ संदीप हांडे हे सध्या आपल्या वाड्यात राहून शास्त्रीय संगीत चे क्लास घेतात.सुरभी ला गायनाचा. छंद होता.त्यांनी नागपूर चे एलएडी कॉलेज,जळगाव येथे शिक्षण घेतले नंतर पुणे फर्गुसन कॉलेज इथून एमए (सायकॉलॉजी) करून जळगाव इथेच स्थायिक झाल्या.दरम्यान 2015 च्या जवळपास त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.अगाबाई अरेच्च्या _२,चित्रपटात पदार्पण करून 2020 मध्ये भुताटलेला चित्रपटात शिवानी ची प्रमुख भूमिका साकारली. या नंतर आंबटगोड, जय मल्हार,गृहमंत्री,चला हवा येवू द्या, लक्ष्मी सदैव मंगलंम, बिगबॉस मराठी_१(अतिथी),गाथा नवनाथांची ,अबोली ई टी वी मालिकेत अभिनय केले. त्यांचे ताराराणी, सोनकळी हे दोन चित्रपट येत आहेत.तिचे 2018 साली दुर्गेश कुलकर्णी सोबत लग्न झाले .
*संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील* वास्तववादी संघर्ष गाथा आहे. येणाऱ्या 21जून ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे म्हणून चित्रपटाचे कलावंत प्रमोशन करिता नुकतेच भंडारा इथे आले होते.येथील शिवम हॉटेल ला त्यानीं भंडारा तील कला क्षेत्राशी संबंधित नागरिक आणि पत्रकारांशी संवाद साधला आणि चर्चा केली.चर्चा दरम्यान चित्रपटाचे नायक रोहन पाटील यांनी सांगितले की "हा संघर्ष प्रत्येकाला ऊर्जा देणारा आहे",मी आपल्याला खूप भाग्यशाली समजतो की मला मनोज जरांगे पाटील ची भूमिका मिळाली,त्यांचें हाव _भाव व प्रत्येक हालचालीचा जवळून अभ्यास केला आणि त्यांनी खूप काही मार्गदर्शन केले.भंडारा जिल्ह्यातील प्रेक्षकांनी अवस्य हा चित्रपट बघावा". संघर्ष योद्धा मध्ये सुरभी ला नायिकेची भूमिका मिळाल्या बद्दल त्यांचे वडील श्री संजय हांडे यांना जळगाव येथे फोन करून शुभेच्छा दिल्या.बॉक्स ऑफिस वर धमाल उडवून देण्यासाठी हा चित्रपट सज्ज आहे.महाराष्ट्रातील प्रेक्षकां मध्ये हा चित्रपट कितपत यशस्वी होईल हे भविष्यातच कळेल.


0 टिप्पण्या