राकेश आसोले चित्रा न्युज
बारामती :- - शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार देण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे, असे रोहित पवार यांनी जाहीर केले. बारामतीच्या दुष्काळी गावांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
"आम्ही निवडणुकीच्या काळात लोकांना दिलेला शब्द पाळणार आहोत. शरद पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत. त्यामुळे जिरायती भागातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करणार आहोत," असे रोहित पवार यांनी सांगितले.
"या वादाच्या मागे समाजकारण आहे की राजकारण, हे बघावे लागेल. या सगळ्या वादात काही प्रमाणात मोठे मूळ मुद्दे बाजूला राहत आहेत. पार्लमेंटमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिल्यासच हे आरक्षण कोर्टात टिकू शकते. सर्व खासदारांची एकत्रित बैठक बोलावून, त्यातून तोडगा काढला पाहिजे. त्यामुळे पार्लमेंटच्या माध्यमातून घटना दुरुस्ती करावी लागेल," असे पवार म्हणाले.
"मंचरच्या घटनेत काय झाले, हे मला माहिती नाही. मोठे वाद आपण सोडवू शकतो. विधानसभेच्या अगोदर या गोष्टींमध्ये बदल घडतील," असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
"कार्यकर्ते भावनिक असतात आणि त्यामुळे मागणी करू शकतात. आमच्या पक्षात कार्यकर्त्यांना मागणी करायला बंदी नाही. जिथे आपला आमदार आहे तिथे कोण लढणार हे शरद पवार ठरवतील," असे पवार म्हणाले.
"लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रामाणिक लढा दिला आणि विधानसभेतही स्वतंत्र लढा लढला जाईल. दोन्ही बाजूने ताकदीने उमेदवार लढतील. शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार देण्याचा आमचा निश्चय आहे," असे पवार म्हणाले.
"उपोषणाच्या बाबतीत सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जरांगे पाटलांची आरोग्याची परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे," असे रोहित पवार यांनी सांगितले.
"शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार देण्याचा आमचा निश्चय आहे. लोकांच्या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेतून तोडगा काढावा लागेल," असे पवार यांनी सांगितले.


0 टिप्पण्या