Ticker

6/recent/ticker-posts

ऊस पीक परिसंवाद व चर्चा सत्र'कार्यक्रम

सोमनाथ खंडागळे सोलापूर 
सोलापूर :-महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर येथे 'ऊस पीक परिसंवाद व चर्चा सत्र'कार्यक्रमाचे उदघाट्न कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. मदनसिंह मोहिते पाटील व विधानपरिषद आमदार तथा श्री. शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी कृषिरत्न, कृषिभूषण, शेतीनिष्ट पुरस्काराने सन्मानित असलेले मा. डॉ. श्री. संजीव माने यांनी ( ऊस लागवड, तणाचा बंदोबस्त खतमात्रा, रोग व कीड नियंत्रण खोडवा संगोपन ) या विषयावर व प्रमुख कृषि विद्या विभाग नेटाफेम इरिगेटर्स इंडिया प्रा. लि. चे मा. श्री. अरुण देशमुख यांनी, ( ऊस पीक पाणी व्यवस्थापन व ठिबक सिंचन काळाची गरज )* या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी *श्री शंकर सहकारी कारखान्याचे व्हा. चेअरमन ॲड श्री. मिलिंद कुलकर्णी, मा. संचालक श्री बाबाराजे देशमुख, सहकार महर्षी कारखान्याचे मा. व्हा. चेअरमन प्रकाश आप्पा पाटील, माळशिरस पंचायत समितीचे मा. उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील,* रवि पाटील साहेब, कृ. बा. स. उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस पं. स. मा. उपसभापती प्रतापराव पाटील, जि. प. सदस्य अरुण तोडकर, पं. स. सदस्य मानसिंग मोहिते, विकास कोळेकर, मा. पं. स. सदस्य. बाळासाहेब लवटे, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक धनंजय सावंत, गोविंदभाऊ पवार, शिवामृत दूध संघांचे संचालक सचिन रणवरे, आप्पासाहेब रूपणवर, तसेच कारखान्याचे आजी माजी संचालक, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर श्री. स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, सर्व खातेप्रमुख, शेतकरी सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार. मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांचा सन्मान श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या