Ticker

6/recent/ticker-posts

प्रीपेड मीटर विरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन


• महावितरण कार्यालयासमोर सरकार विरोधात घोषणा 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- राज्य शासनाने महावितरण च्या माध्यमातून राज्यातल्या सर्व विद्युत ग्राहकांची मीटर प्रीपेड करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी बुधवार(ता.१२जून) रोजी अधीक्षक अभियंता कार्यालय एमएसीबी कॉलनी येथे घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध केला आहे. 
                   राज्य सरकारने राज्यात प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला असून याचा भुर्दंड राज्यातील गोर गरीब जनतेवर पडणार आहे. अनेक वीज ग्राहकांचे मीटर सुस्थितीत असतांनाही त्यांना या प्रीपेड मीटर चा अकारण भुर्दंड सहन करावा लागणार आहे. राज्यात प्रीपेड मीटर सक्तीचे करू नये. या विरोधात आम आदमी पार्टी टप्प्याटप्प्याने राज्य शासनाविरोधात आंदोलन करणार आहे. प्रथम टप्प्यात महावितरण चे जिल्हा व तालुका कर्यालयासमोर शासन विरोधात घोषणा देऊन निषेध करणे व निवेदन देणे. असे आंदोलनाचे स्वरूप होते. आम आदमी पार्टी जिल्हा शाखा भंडारा चे वतीने बुधवारी(ता.१२जून) सकाळी ११:३० वाजता अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी एमएसीबी कॉलनी भंडारा येथे जिल्हाध्यक्ष चंचल साळवे यांचे नेतृत्वात एमएसईडीसीएल महाराष्ट्र द्वारे संपूर्ण महाराष्ट्र सक्तीचे केले गेलेले स्मार्ट विद्युत मीटर लावण्याबाबद घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टीचे प्रवक्ता डॉ. नितीन सुरसकर शहराध्यक्ष अतुल लोणारे, दिलीप कुमार निखाडे, दिलीप कुमार घरडे, सुरज मदनकर, पवन घन, अन्वर शेख, भूपेश गणवीर, आकाश नवल ननवरे, सुभाष मंजूरकर, कामेश लेंडे, सत्यजित लेंडे, ज्ञानेश्वर फुले, सुनिता वाहने, सोनाली फुले, धम्मदीप चव्हाण, नरेश सर्वे, सुवर्णा मेश्राम, छाया घरडे, सचिन बालपांडे, आकात बनपूरकर, किशोर मेश्राम, स्वप्निल शिंदे, व इतर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या