• शालेय शिक्षण विभागाचे आदेश
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांनी मध्यन्न भोजन योजनेअंतर्गत पोषण आहार देण्यात येत होता. एकाच मेन्यू असल्यामुळे पोषण आहाराने विद्यार्थी कंटाळले होते. आहारात विविधता आणावी या करिता सोयाबीन पुलाव, नाचणीचे सत्व तसेच मोड आलेली कडधान्य व तृणधान्य असलेल्या १५ प्रकारांच्या पाककृतीचा समावेश करावा. अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे. मात्र सरकारी आदेशात दूध पावडर व गूळ साखर या संधीचा वाढीव खर्च भागविण्याच्या तरतुदीचा उल्लेख आहे. त्यामुळे इतर धान्य व भाजीपाला कुठून आणायचा. असा प्रश्न शाळांसमोर ठाकला आहे.
पूर्वीची शालेय पोषण आहार योजना सध्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या नावाने संचलित केली जात आहे. त्यात इयत्ता १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. त्या करिता केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरात तांदूळ पुरविला जातो. मात्र इतर खर्च भागविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध केला जात नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये मूग डाळीचा खिचडीवरच विद्यार्थ्यांची बोळवण केली जात असे. आताही विद्यार्थ्यांना खिचडीऐवजी चौरस आहार मिळावा. या करिता १५ प्रकारची विविध पदार्थ पाककृतीसह सुचविले आहे. तसेच दररोज मोड आलेली कडधान्य देण्याची सूचना केली आहे. मात्र त्या करिता अतिरिक्त आर्थिक तरतूद केली गेली नसल्यामुळे ह्या सूचना कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शालेय पोषण आहारासाठी राज्य सरकारने सुचविलेल्या. पाककृती स्वागतार्ह आहेत. राज्यातील विद्यार्थी सकस आहारावर पोषला जावा. ही सरकारची अपेक्षा योग्य आहे. मात्र पंतप्रधानाच्या नावाने राबविल्या जाणाऱ्या या योजनेकरिता त्यांचे वालयास साजेशी तरतूद होणे आवश्यक आहे. याशिवाय सक्षम यंत्रणा उपलब्ध केली गेली तरच ही योजना परिणामकारक ठरेल. असा शिक्षकांसह पालकरून सुर उमटत आहे.
अशा आहेत १५ पाककृती
भाज्यांचा पुलाव, मसाले भात, मटर पुलाव, मूग डाळीची खिचडी, चवळीची खिचडी, चाना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, अंडे पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, वरण भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्व, मोड आलेले कडधान्य ह्या १५ पाककृती आहेत.
भाज्या शाळांच्या परसबागेतून
विद्यार्थ्यांच्या आहारात स्थानिक अन्नधान्य, तृणधान्य व इतर पदार्थांचा समावेश करून आहार दर्जा व पौष्टिकता वाढविण्याकरिता तसेच वैविध्यता आणण्यासाठी आरोग्य, आहार शैक्षणीक तज्ञांचा समावेश असलेली समिती नेमली होती. या समितीच्या शिफारसीवरुन १५ पाककृती स्वीकारण्यात आल्या आहेत. यास लागणाऱ्या भाज्या शाळा परसबागेत पिकवतील असे गृहीत धरण्यात आले आहे.


0 टिप्पण्या