• घटनेचा व्हिडिओ व्हायरल, शहरात खडबड
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- दुचाकी अपघात प्रकरणात झालेली नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने सीआरपीएफ केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या सैनिकास भोजपुर-खोकराला येथे रस्त्यावर महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पती व मुलाने सैनिकास अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवार(ता.११जून) सकाळी ११:३० वाजता दरम्यान घडली. भंडारा पोलिसांत परस्परांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण सैनिकाला मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने सर्वत्र खडबड उडाली आहे.
खोकरला ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गंगा नगर येथील विवेक नंदनवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असून श्रीनगर येथे ते कर्तव्यावर आहेत. काही दिवसाची रजा घेऊन ते शहरालगत असलेल्या खोकरला येथे स्वघरी वास्तव्यास आहेत. मंगळवारी दुचाकीने काही कामानिमित्त भंडारा येथे गेले होते. कामे आटोपून परत येत असताना भोजापुर-खोकरला(नहर) लगत त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६ एडी १४१३ ला मागेहून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ३६ एडी ८६०४ ने येणाऱ्या महिला ग्रामपंचायत सदस्याचे मुलाने सीआरपीएफ जवानाच्या गाडीला धडक दिली. तथा १५ हजार नुकसान भरपाईची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने मुलाने ग्रामपंचायत सदस्य असलेल्या आई व वडीलास फोन करून अपघात स्थळी बोलाविले. आई वडील येताच कसलीही सहनिशा न करता सीआरपीएफ जवान विवेक नंदनवार यांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून महिला ग्रामपंचायत सदस्याचे पती व मुलाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खडबड उडाली आहे. भंडारा पोलिसांनी एकमेकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सीआरपीएफ जवानाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने आजी-माजी सैनिकांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.


0 टिप्पण्या