Ticker

6/recent/ticker-posts

मोटारसायकल स्लीप होऊन चालक ठार

• पवनी टी-पॉइंट येथील घटना 

• पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- आठवडी बाजारातून साहित्य खरेदी करून जात असतांना अचानक मोटारसायकलवरील संतुलन बिघडून स्लीप झाल्याने चालक सिमेंट रस्त्यावर पडून ठार झाल्याची घटना मंगळवार(ता.११जून) सायंकाळी ६:०० वाजता दरम्यान पवनी टी-पॉइंट येथे घडली. मृतक मोटारसायकल चालकाचे नाव रवींद्र वासुदेव बोरकर(४५) रा. लाखांदूर(प्लॉट) असे आहे. लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
                       रवींद्र बोरकर हा गोल्डन बँड रेस्टॉरंट येथे रोजंदारीवर कामास होता. मंगळवारी लाखांदूर चा आठवडी बाजार असतो. रेस्टॉरंट ला लागणारे साहित्य घेण्यासाठी तो रेस्टॉरंट मालकाची मोटारसायकल घेऊन गेला होता. साहित्य खरेदी करून परतीचे प्रवासात पवनी टी-पॉइंटवर त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून अचानक स्लीप झाल्याने तो सिमेंट रस्त्यावर पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळाचे आजूबाजूला उपस्थितांनी अपघाताची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस उपनिरीक्षक विजय सिंग गोमलाडू, अनिल मांदाळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून सर्व सोपस्कार पार पाडले व गंभीर जखमीला ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले. मृतकाचे कुटुंबियांचे फिर्यादी वरून लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी पाठविला. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. त्याचेवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मन मिळावू रवींद्र च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या