Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जनता दरबार सुरू

राकेश आसोले चित्रा न्युज 
बारामती :-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार शहरातील पार्टी कार्यालयात दाखल झाले आहेत. शरद पवार यांचा जनता दरबार सुरू असून, नागरिकांची तुफान गर्दी जमलेली आहे. 

शरद पवार यांच्यासोबत युवा नेते युगेंद्र पवार हे देखील उपस्थित आहेत. नागरिक विविध प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि अनेक प्रश्नांची सोडवणूक शरद पवार आणि युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून होत आहे.

या कार्यक्रमाला विधानसभेसाठी युगेंद्र पवारांची रंगीत तालीम मानली जात आहे. जनता दरबारात युगेंद्र पवारांचा सहभाग त्यांच्या राजकीय भविष्याचे संकेत देत आहे.

शरद पवार यांचा जनता दरबार नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या