Ticker

6/recent/ticker-posts

जल पर्यटनापूर्वी गोसे बाधितांचे पुनर्वसन व दूषित पाण्यावर उपाययोजना करा

शिवसेना (उ.बा.ठा)चे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा - भंडारा शहरालगतच्या वैनगंगा नदीवर जल पर्यटन सुरू करण्याआधी गोसे प्रकल्प (इंदिरा सागर) बाधितांचे पुनर्वसनाचे प्रश्न व नाग नदीमुळे दूषित होणारे  वैनगंगेचे पाण्यावर उपाययोजना करण्यात यावी याकरिता शिवसेना (उ.बा. ठा)चे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांचे नेतृत्त्वात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचेमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे . 
       जिल्ह्यात बहुचर्चित गोसे धरण तयार झाले असले तरी उपकालवे नसल्यामुळे  शेतकऱ्यांना पर्याप्त सिंचन सोयीचा लाभ होत नाही . गोसे धरणामुळे पुनर्वसनाचा प्रश्न आज ही कायम आहे . नाग नदीचे   पाणी धरणात सोडल्यामुळे पाणी दूषित झाले आहे . आपणाकडून जलपर्यटनाचे भूमिपूजन केले असले तरी मूळ प्रश्नाना बगल दिली असल्याचे निवेदनात नमूद आहे . धरणात साठविलेले पाणी दूषित असल्यामुळे उन्हाळ्यात उग्र वास येतो त्यामुळे आपले प्रयत्नातून सुरू होणारा जल पर्यटन भविष्यात धोक्यात येणार असल्याची शंका शिवसेना (उ.बा.ठा)  द्वारे निवेदनातून व्यक्त केली गेली आहे .  
          धरणाचे काम सुरु झाल्यानंतर मागील ३५ वर्षापासून पुनर्वसनाचे काम कासव गतीने सुरू आहे . चुकीच्या सर्वेक्सनामुळे जी गावे बाधित नव्हती ती गावे पण आता बाधित झाली असल्यामुळे अनेक गावे पुनर्वसनाचे प्रतीक्षेत आहेत . आधी त्यांचे पुनर्वसन करून उपकालव्याची कामे  तातडीने मार्गी लावावीत. त्यामुळे जनतेच्या अडचणी कमी होऊन जीवन जगणे सुसह्य होईल . शासनाच्या विविध  योजनातून जिल्ह्यात जो निधी विकास कामासाठी मंजूर होऊन खर्च होतो त्या कामात कमी खर्च व कंत्राटदार, अधिकारी व लोकप्रतिनिधींचे खिषे गरम होत असल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होतात . त्यामुळे सार्वजनिक पैशाचा अपव्यय होतो. या सर्व बाबींची चौकशी करून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी याकरिता शिवसेना (उ.बा.ठा) चे वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, ॲड. रवी वाढई, नरेश डहारे, दीपक गजभिये , देवेंद्र कारेमोरे , आशिक चुटे , नरेंद्र पहाडे , हर्षल टेंभूरकर, ललित बोंद्रे , राकेश आग्रे , विकास बागडे , आशिष गणवीर , जयश रामटेके , गुरुदेव साकुरे, रजत साखरे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या