कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यालय रमाई आंबेडकर वार्ड भंडारा येथे आरक्षणाचे पुरस्कर्ता छञपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, प्रमुख अतिथी युवक आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जनबंधू, जिल्हा संघटक डी.जी. रंगारी, उपाध्यक्ष सुरेश खंगार, डॉ. सुनील जिवनतारे, चरणदास मेश्राम यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी छञपती शाहू महाराजांचे जिवन व कार्यावर प्रकाश टाकला. तसेच त्यांचे विचार अंगीकारण्याचे उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन भागवत मेश्राम तर आभार सुरेश खंगार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यादवराव गणवीर, केवळदास घरडे, श्रीकांत नागदेवे, नेहाल कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास बौद्ध उपासक, उपासिका व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या