हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
रत्नागिरी:- १२ जून २०२४ - रत्नागिरी शहरात आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे नागरिकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला असून, रस्त्यावरील वाहतूक काहीशी मंदावलेली दिसत आहे.
पावसाच्या जोरदार सरी बरसल्यामुळे अनेक भागांत पाणी तुंबल्याचेही चित्र दिसत आहे. यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, अनेकांच्या कामांमध्ये अडथळे आले आहेत.
शहरातील स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या असून, पाणी तुंबलेल्या भागांतून पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांनी सावधानतेचे आवाहन करण्यात आले असून, गरजेच्या वेळीच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरीत पावसाचा हा जोर काही दिवस असाच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


0 टिप्पण्या