Ticker

6/recent/ticker-posts

माजलगाव तालुक्यात सलग चौथ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी; सरस्वती नदी खळखळून वाहू लागली

राकेश आसोले चित्रा न्युज 
बीड :-१२ जून २०२४ - बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात सलग चौथ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी राहिली आहे. तेलगाव, साळेगाव, दिंद्रुड या परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाधार पावसाने कहर केला आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून, साळेगाव येथील सरस्वती नदी पात्र सोडून वाहू लागली आहे. 

पावसामुळे स्थानिक नागरिकांचा माजलगावशी संपर्क तुटला आहे. सरस्वती नदीवरील पुलाची पुनर्बांधणी करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे, परंतु हा प्रश्न अद्याप सुटला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रत्येक वर्षी मान्सून सुरू होताच हा प्रश्न उफाळून येतो आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने मिळतात. यावर्षीही पुलाच्या अभावी लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सततच्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

"आम्ही अनेक वेळा पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे, पण अजूनही काहीच झालेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात आमचा माजलगावशी संपर्क तुटतो आणि आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो."

स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या