Ticker

6/recent/ticker-posts

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे वेळेत पूर्ण करा

• मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना 


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- पावसाळ्यास सुरुवात झाली आहे. गटारातून(नाली) सांडपाण्याची निकसी न झाल्यास पावसाचे पाणी रस्त्यासह शहरातील सखल भागात साचून झोपडपट्टीतील काही घरांत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काही शहरवासी कचरापेटी व्यतिरिक्त बाहेर कचरा टाकत असल्यामुळे दुर्गंधी सुटून आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकते. शहरवासीयांचे सोयीचा विचार करून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे वेळेत पूर्ण करावी. अशा मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.  
                     भंडारा नगर परिषदेवर वर्षभरापासून प्रशासक राज सुरू आहे. मागील ३ महिन्यापासून मुख्याधिकारी तथा प्रशासकाचे कामकाज करणकुमार चव्हाण सांभाळीत आहेत. त्यांनी नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारताच शहराचा फेरफटका मारल्यानंतर शहरातून सांडपाणी वाहून नेणाऱ्या बंदिस्त गटारांवर अतिक्रमण असल्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची सफाई करण्यास अडचण निर्माण होऊन सांडपाण्याची समस्या निर्माण होते. असे त्यांचे निदर्शनास आले. तसेच शहरातील सर्वच प्रभागात मौक्याच्या ठिकाणी कचरापेट्या ठेवलेल्या आहेत. काही नागरिक कचरापेटीऐवजी बाहेर कचरा टाकून शहर अस्वच्छ करीत असल्याचे दिसून आले. या प्रकाराने सांडपाणी व घनकचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. असा मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी निष्कर्ष काढून यावर उपाययोजना करण्याचे ठरविले. सर्वप्रथम बंदिस्त गटारांवरील काही व्यवसायिक व धनदांडग्यांचे अतिक्रमण काढून गटारे साफसफाईसाठी खुली केली. प्रत्येक प्रभागात घंटागाडी पाठवून घनकचरा संकलन सुरू केला. तसेच शहरात मौक्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरापेट्या बाहेरील घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. गटारे स्वच्छ झाल्याने सांडपाण्याची योग्य रीतीने निकासी होऊन रस्त्यावर पाणी जमा होणार नाही. पर्यायाने शहरवासियांची गैरसोय होणार नाही. याकडे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांचा कटाक्ष असल्याने सांडपाणी व घनकचऱ्याची कामे वेळेत पूर्ण करा. अशा स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना केल्याने सुंदर व स्वच्छ शहर होईल यात शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या