• काँग्रेस चे जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे यांनी व्यक्त केला मनोदय
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- समाजकारणातून राजकारण करणारे तळागाळातील विद्यार्थ्यांची शिक्षणासह अधिवासाची सोय करून ग्रामीण परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गाव आणि परिसरात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे भंडारा जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे यांनी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
सेवानिवृत्त प्राचार्य धनंजय तिरपुडे यांचे वडील पुंडलीकराव तिरपुडे हे अतिशय गरीब कुटुंबात जन्मास आले. नाना प्रकारच्या हालअपेष्ठा सहन करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी. या करिता त्यांनी लोकवर्गणीतून आर्थिक बळ जमा करून "जीवन शिक्षण संस्थे"ची निर्मिती केली. या शिक्षण संस्थेतून जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातही प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन तसेच व्यवसायिक शिक्षणाची गरीब विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून दिली. त्यांचे मृत्यूपश्चात त्यांचा समाजसेवेसाठी शैक्षणिक वारसा सेवानिवृत्त प्राचार्य धनंजय तिरपुडे चालवीत आहेत. पूर्वीपासूनच त्यांचे घराणे काँग्रेसी आहे. सेवानिवृत्त प्राचार्य धनंजय तिरपुडे यांनी सेवा काळात काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न केल्यामुळे ग्राम पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत काँग्रेस कमिटीची अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविलेले आहेत. सध्या ते भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव पदी कार्यरत आहेत. नगरसेवक असताना त्यांनी प्रभागात अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्यांना प्रशासनसह लोकप्रतीनिधिंचा अनुभव असून धनंजय तिरपुडे यांचे जिल्ह्यातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संघटनांशी संबंध आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क व अनुसूचित जातीचे असल्यामुळे अनुसूचित जातीसाठी आरक्षित भंडारा विधानसभा क्षेत्रातून पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय धनंजय तिरपुडे यांनी व्यक्त केला आहे.


0 टिप्पण्या