रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर:-नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौक ओलांडताना सुसाट ट्रकच्या धडकेत अनिता यतीराज बाहेती जागीच ठार झाल्या. मंगळवारी रात्री ७.४५ च्या सुमारास हा अपघात झाला.
अनिता व पती यतीराज यांच्यासह महेशनगरकडून आकाशवाणीच्या दिशेने रस्ता ओलांडत होत्या. त्याच वेळी मोंढ्याकडून सेव्हनहिलकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात यतीराज गंभीर जखमी झाले. तर पत्नी अनिता जागीच ठार झाल्या.
मूळ धुळ्याचे असलेले बाहेती कुटुंब नोकरीनिमित्त मुंबईच्या डोंबिवलीत स्थायिक झाले होते. महेशनगर येथील एका नातेवाइकाच्या उत्तरकार्यासाठी बाहेती दाम्पत्य आले होते. रात्री ९ वाजेची परतीची रेल्वे असल्याने ते आकाशवाणी चौकात आले. रिक्षासाठी रस्ता ओलांडत असताना सिलिंडर ट्रक (एम एच २६ एच५९८३) चालकाने त्यांना उडवले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालकाने अनिता यांना अक्षरशः १५ ते २० फूट फरपटत नेले. त्यानंतर ट्रक सोडून चालक पसार झाला.


0 टिप्पण्या