Ticker

6/recent/ticker-posts

"विद्यार्थ्यांनो खुल्या डोळ्यांनी स्वप्न पहा" - खासदार डॉ. प्रशांत पडोळे

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- नुकत्याच पार पडलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत विजयी नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांचेसह इयत्ता १०वी आणि १२वी मध्ये उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भंडारा जिल्हा ख्रिस्ती सेवक संगती व भंडारा जिल्हा काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने स्थानिक साई मंगल कार्यालय भंडारा येथे पार पडला. त्यात "विद्यार्थ्यांनो झोपेत पाहिलेलं स्वप्न कधीही साकार होत नसतात, त्याकरिता खुल्या डोळ्यांनी स्वप्न पहावे लागेल" असे प्रतिपादन सत्कारमुर्ती नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी मार्गदर्शन व्यक्त केले. सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन पंचभाई, प्रमुख अतिथी भंडारा जिल्हा महिला कांग्रेस कमिटी अध्यक्षा जयश्री बोरकर, जिल्हा कांग्रेस महासचीव धनंजय तिरपूडे, प्रमुख पाहूणे म्हणून कमल साठवणे व धारगावे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी ५० विद्यार्थ्यांचा पाहूण्यांचे हस्ते ट्राॅफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मास्टर राकेश कोडापे, प्रास्ताविक योगेश कोसरे व आभार सुधाकर बावणे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रामकुमार पटेल, रोशन मिश्रा, उमेश थाॅमस, संघदिप डोंगरे, बबलू देऊरकर, सत्यदान खंडागळे, संजय टेकाम, विलास नवले, वेंकटेश गुंजेवार, धिरज लांजेवार, राहुल मेश्राम, अशोक शेंडे, जगदीश कुंभरे, लिलाधर सुखदेवे, राजेश सानसरोदे, जितेंद्र मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले. या सत्कार समारंभास विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या