Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस निरिक्षकासह तपास अधिकाऱ्यास निलंबित करावे

• मंदा गभने यांची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:- दखलपात्र स्वरूपाची तक्रार असताना सुद्धा चौकशी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे यांनी विरोधकांशी अर्थकारण करून गुन्हा दाखल करण्याचे सौजन्य दाखविले नसल्यामुळे विरोधकांनी दुसऱ्यांदा सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांचे पोल्ट्री फार्म चे नुकसान केल्याने चौकशी अधिकाऱ्यासह पोलिस निरीक्षक लाखनी हे व्यक्तिशः जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप मंदा गभने यांनी केला असून त्यांना निलंबित करावे. या साठी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचेकडे तक्रार केली आहे. संबंधितांवर काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 
                        मंदा गभने सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन पोल्ट्री फार्म आहे. त्यांनी सावरी येथील तत्कालीन सरपंचाने सिमेंट रस्ता तयार न करता सार्वजनिक रकमेची अफरातफर केली. तसेच आबादी जागेतील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण देऊन घरे बांधल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्ता नसल्यामुळे अतिक्रमण काढण्यात यावे. या करिता मंदा गभने यांनी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाकडे ४ एप्रिल २०२४ रोजी तक्रार दिली होती. कारवाईचे भीतीपोटी प्लॉटधारक, तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावातील ४ ते ५ लोकांशी संगनमत करून १६/०५/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास पोल्ट्री फार्म मध्ये आग लावून १० हजार रुपयाचे नुकसान केल्याची १७/०५/२०२४ रोजी पोलिस ठाणे लाखनी येथे तक्रार दाखल केली. दखलपात्र स्वरूपाची तक्रार असताना सुद्धा पोलिस निरीक्षक व चौकशी अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे सौजन्य दाखविले नसल्यामुळे ४ ते ५ इसम तू आमचे काय बिघडविले, कशी फार्म चालविते ते आम्ही बघून घेऊ. असे बोलून धमकी देत होते. पोलिसांकडून कसलीही कारवाई न केल्यामुळे त्यांची हिम्मत वाढून ४ जून २०२४ रोजी रात्रीचे सुमारास साहित्याची नासधूस करून पोल्ट्री फार्म मध्ये प्रवेश करून १३ गावठी कोंबळ्यांना ठार मारले. या बाबद भ्रमणध्वनी व्दारे लाखनी पोलिसांना माहिती देऊन आधी दिलेल्या तक्रारीवरून कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता. यात मंदा गभने यांचे २१ हजार ३७५ रुपयाचे नुकसान झाले होते. भ्रमणध्वनी सूचनेवरून ४ पोलिस आले. मौका तपासणी केली मेलेल्या कोंबड्यांचे मोबाईल मध्ये फोटो घेतले. पण घटनास्थळ पंचनामा व मृत कोंबड्यांचे पोस्टमोर्टम केले नाही. असे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. 
                      सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांनी दिलेली तक्रार दखलपात्र स्वरूपाची असताना पोलिस निरीक्षक लाखनी आणि चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे यांनी गुन्हा दाखल केला नाही व घटना घडल्यानंतर चौकशीसाठी आले नाही. तक्रारकर्ती ४ दिवसानंतर पोलिस निरीक्षक लाखनी यांचेकडे गेली असता त्यांनी चौकशी अधिकाऱ्याकडे भेटायला सांगितले. चौकशी अधिकाऱ्यास विचारणा केली असता "मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येईन, मी तुमच्या मताप्रमाणे येणार नाही" असे उलट उत्तर दिले. यावरून तपासी अधिकारी यांनी विरुद्ध पार्टीकडून अर्थकारण करून त्यांना सहकार्य करीत असून यात पोलिस निरीक्षकांचाही सहभाग असल्याचा सामाजिक कार्यकर्त्या मंदा गभने यांनी आरोप केला असून पोलिस निरिक्षकासह चौकशी अधिकाऱ्याने पदाचा दुरुपयोग व कर्तव्यात कसूर केली असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे. या करिता जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचेकडे तक्रार केली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून काय कारवाई केली जाते. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या