राकेश आसोले चित्रा न्युज
पुणे :-येथील हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना झाल्याच्या निषेधार्थ येवला शहरातील सकल हिंदू समाजाने आक्रमक होत विंचूर चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत होते. या निषेधाच्या वेळी नाशिक-छत्रपती संभाजी महामार्ग आणि मनमाड-नगर महामार्ग रोखण्यात आले.
नीचेकेत राऊत, आनंद शिंदे, आणि लखन शिंदे या आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना हा गंभीर अपराध असून, त्याला कडक शिक्षा होणे आवश्यक आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन शांततेत पार पडले आणि त्यांनी प्रशासनाला याची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले.
- नीचेकेत राऊत : "शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना हा अतिशय निंदनीय कृत्य आहे. आरोपीला कडक शिक्षा मिळावी अशी आमची मागणी आहे."
- आनंद शिंदे : "आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे."
- लखन शिंदे: "हे फक्त एका पुतळ्याचे विटंबना नाही तर आमच्या श्रद्धेचा अपमान आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी."
या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, परंतु आंदोलकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून लक्ष देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन शांततेत संपविण्यात आले.


0 टिप्पण्या