Ticker

6/recent/ticker-posts

कुलरच्या करंटने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

मालदा येथील घटना 
 
पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- अनावधानाने कुलाराला हात लागल्याने कुलराचा जोरदार करंट लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी(ता.७जुलै) रोजी रात्री ८:०० वाजता दरम्यान मालदा, तालुका लाखांदूर येथे घडली. मृतक युवकाचे नाव महेश परसराम खोब्रागडे(२५)  रा.मालदा, तालुका लाखांदूर असे आहे. दिघोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदास धंदर यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
                       रविवारी रात्रीचे सुमारास महेश खोब्रागडे वास्तव्यास असलेल्या घरातील कुलरला अनावधानाने हात लागून करंट लागला ही बाब कुटुंबीयांना कळताच त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने तपासून त्याला मृत घोषित केले व घटनेची माहिती दिघोरी/मोठी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व सोपस्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी पाठविला. शव परीक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिघोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदास धंदर यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार कोडापे तपास करीत आहे. पोलिस उपनिरीक्षक अजय मडावी यांनी भेट दिली होती. मन मिळावू महेश च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

लाखांदूर तालुक्यातील तिसरी घटना

७ जुलै रोजी अनावधानाने कुलरला झालेल्या स्पर्शाने मालदा येथील २५ वर्षीय महेश खोब्रागडे याचा मृत्यू झाला. कुलरच्या करंट ने मृत्यू झाल्याची ही लाखांदूर तालुक्यातील तिसरी घटना असून या आधी २ जुलै रोजी मोहरणा येथे कुलरच्या खाली ठेवलेल्या टोपलितून भाजीपाला काढताना ४६ वर्षीय आशा भाष्कर चौधरी यांचा तर घरातील केरकचरा झाडून काढतेवेळी कुलरला धक्का लागला असता कुलर पायावर पडल्याने कुलरचा करंट लागून ६५ वर्षीय तुळसन डाकराम दोणाडकर यांचा मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी सावरगाव येथे घडली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या