• प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे प्रतिपादन
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- लोकसभा निवडणुकीत बूथ कमिटीने ग्रामीण स्तरावर प्रामाणिकपणे पक्षाचे काम केल्याने निकाल आपल्या समोर आहे. तसाच प्रयत्न विधानसभा निवडणुकीत करणे आवश्यक आहे. जेणे करून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल. निवडणूक प्रक्रियेचा पक्षाचा प्रमुख कणा बूथ कमिटी आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी मजबूत बूथ कमिटी असणे आवश्यक आहे. असे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित खासदार सत्कार सोहळ्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना विचार व्यक्त केले.
लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने रविवार(ता.७जुलै) रोजी कच्ची मेमन सभागृहात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेवराव किरसान, देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, विद्या कुंभरे, सरिता कापसे, जिल्हा महासचिव राजू निर्वाण, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष योगराज झलके यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
आमदार नाना पटोले, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सहसराम कोरोटे व उपस्थित पदाधिकारी यांचेवर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. माजगाव क्रिकेट असोशिएशन च्या सदस्य पदी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल तसेच नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे व डॉ. नामदेव किरसान यांचा लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संबंधाने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्ता मेळाव्याचे सूत्रसंचालन धनपाल बोपचे, प्रास्ताविक ऍड. शफी लढ्ढानी तर आभार लाखनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष योगराज झलके यांनी मानले. महिला काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष पुष्पा डुंभरे, शहर अध्यक्ष मोहन निर्वाण, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष यशवंत खेडीकर, शहर युवक अध्यक्ष विपुल कांबळे, जयकृष्ण फेंडरकर, अशोक चोले, डॉ. विकास गभने, मनोहर बोरकर, बापू डोरले, सेवादल तालुकाध्यक्ष अनिल बावनकुळे, अनिल हारोडे, अशोक बडवाईक यांनी परिश्रम घेतले. या कार्यकर्ता मेळाव्यास तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या