श्रीकांत बारहाते हिंगोली
हिंगोली :- नालीला आलेल्या पुराच्या पाण्यातून जाणारी वयोवृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून जात होती. पुराच्या पाण्यात तप धरून उभ्या असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला गावातील ग्रामस्थांनी धाव घेत दोरीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ही घटना अप्पर पेठ रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या छोट्या पुलावरून पुराचे पाणी तीव्र प्रवाहाने वाहत होते.
त्याच पुलावरन वामन देवकर हे पाण्याच्या पुरातून काठीचा आधार घेऊन जात होते. व याच वेळी पाण्याचा प्रवाह जास्त वेगाने असल्याने ते पुराच्या पाण्याच्या दिशेने ओढल्या गेल्याने त्यांच्या हातात असलेल्या काठीच्या आधारावर त्याच ठिकाणी ते तप धरून पुराच्या पाण्यातच उभे राहिले.
याचवेळी ग्रामस्थांनी त्या वयोवृद्धाला थोडाही विलंब न करता वेळीच त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढण्यात आलं


0 टिप्पण्या