Ticker

6/recent/ticker-posts

वारूळवाडी ग्रामपंचायत तर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे भव्य नियोजन रविवार 25 ऑगस्ट रोजी..!

सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज


ठाणे :--विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीचे आयोजन ग्रामपंचायत वारुळवाडी व राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  वारुळवाडी ग्रामपंचायत येथे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आलेले आहे.

      साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने  *बहीण  लाडाची, साडी* *सन्मानाची*
गोरगरीब महिलांना साडी वितरण समारंभ तसेच कला ,क्रीडा, साहित्य, शिक्षण, पत्रकार,प्रशासन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभूषण व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

     या निमित्ताने डॉ. लहू खैरे( वैद्यकीय सेवा पुरस्कार), भगवान काशीद (आदर्श शिक्षक पुरस्कार),  सौ.स्वाती हिराचंद खुडे (आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार ) शकीलभाई मनियार (पत्रकारिता पुरस्कार), शांताराम डोंगरे (आदर्श शिक्षक पुरस्कार), नवनाथ भागवत (नवउद्योजक पुरस्कार), अमोल अंकुश (सामाजिक योगदान पुरस्कार ),नरेश पंचरास (सनई सम्राट पुरस्कार), शाहीर ठकसेन शिंदे (शाहिरी पुरस्कार), दादाभाऊ आल्हाट (सनई सम्राट पुरस्कार), गणेश साळवे (गुणवंत कलावंत पुरस्कार), गायत्री शेलार (गुणवंत गायिका पुरस्कार), धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था (आदर्श नागरी पतसंस्था पुरस्कार), नंदू नेटके (उत्कृष्ट गायक पुरस्कार), रामदास भोईर (उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार ),प्रशांत भुजबळ (आदर्श लिपिक पुरस्कार),

     तर आदर्श सरपंच वारूळवाडी राजेंद्र तुकाराम मेहेर यांना आदर्श सरपंच म्हणून   दै.नवराष्ट्र पुरस्कार प्राप्त झाला. आदर्श शिक्षणाधिकारी सौ. अनिता शिंदे ,राज्य पुरस्कार प्राप्त कैलास नारायणगावकर, विठाबाई जीवनगौरव पुरस्कार प्राप्त  ढोलकी सम्राट जनार्दन वायदंडे , कार्यकुशल शिक्षणविस्तारधिकारी विष्णू  धोंगडे या मान्यवरांना शाल ,श्रीफळ, ट्रॉफी, सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .
     या कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम शाहीर ठकसेन शिंदे, नरेश पंचरास, गायत्री शेलार, दादाभाऊ आल्हाट ,गणेश साळवे, नंदू नेटके हे गुणवंत कलावंत पारंपरिक कला सादर करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना  आदरांजली अर्पण करणार आहेत.
    अशी माहिती राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील  संस्थेचे तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण शासन पुरस्कार्थी  काशिनाथ आल्हाट यांनी दिली आहे.

     कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अमित आल्हाट, किशोर आल्हाट,नाथा कसबे, सुभाष दुबळे, अनिल खुडे , अनिल शिंदे, पांडुरंग नेटके, उत्तम वायदंडे,सुनील आल्हाट, दिपक आल्हाट, नरेश आल्हाट,राजू आल्हाट साईनाथ कनिंगध्वज,  विजय आल्हाट, सचिन लोखंडे, जयदास साळवे, राहुल  आल्हाट,रमाकांत खुडे, नवनाथ आल्हाट, निलेश आल्हाट,पवन लोखंडे,प्रविण खुडे,अमोल आल्हाट , गजानन आल्हाट,अमोल गावडे  या मान्यवरांनी केले  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या