Ticker

6/recent/ticker-posts

२५ ऑगस्ट रोजी वर्धा येथे महाराष्ट्र राष्ट्रीय अधिवेशना मध्ये मा. वामन मेश्राम यांच्या हस्ते डॉ सचिन भिमकर यांच्या तरुणांच्या समस्या व त्यांचे निवारण पुस्तकाचे प्रकाशन


सोनू संजीव क्षेत्रे  चित्रा न्युज

 आज दैनंदिन जीवन जर बघीतले तर खूप धावपळीचे जीवन झाले आहे कारण आज जर तरूणाला बघायला गेले तर हाताला पाहीजे तसे काम नाही,तोच तरूण व्यसनाधीन झाला आहे,तोच तरूण आज बेरोजगार आहे,तोच तरूण आज भरकटलेला आहे,शिक्षणाची कमतरता असली की पाहीजे तसे हाताला काम मीळत नाही
मी लेखक डाॅ सचिन वंदना नरेंद्र भिमकर आपल्या समोर या सर्व समस्येचे निवारण व्हावे म्हणून आपल्या समोर या पूस्तकाला आणतो आहे संगत चांगल्यांची व वाईटांची आता आपल्या समोरे प्रश्न उभा राहील की आपल्याला चांगलेच व्हायचे आहे.आपल्याला चांगली संगत असली पाहीजे.आपले मित्र सर्व चांगले असले पाहिजे परंतु हे सर्व गोष्टी करत असतांना एक महत्वाचे आपण विचार करायचा की जोवर आपण चांगले कर्म,चांगली वागणूक करत नाही तोवर आपल्याला चांगले मित्र मीळत नाही म्हणून आपण आपल्या मधले काही दोष,वाईट कामे आपण आपल्या पासुन दुर ठेवले पाहिजे तरच मग आपली चांगली,कृती बघुन आपल्याला  संगती सुद्धा चांगल्या मिळतील. परंतु ज्या आई वडीलांनी आपल्याला जन्म दिला आणि त्यांच्या ज्या आपल्या प्रती आशा,अपेक्षा असतात की आपला  मुलगा/ मुलगी ही खुप शिकाव आणि त्याला चांगली नोकरी मिळावी व त्यांचे समाजात नाव व्हावे खरच आपले या शब्दांकडे लक्ष असते का,आपण त्या गोष्टीची पुरती करतो का ?आपण जगात वावरत असताना आपल्या वयातील काही तरुण आई-वडीलांना बोलतात अक्षरशा मारायला धावतात त्यांच्या आपल्यावर असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करत नाही आपण वाइट मार्गाला लागतो, आपल्याला वाइट मित्राच्या संगतीने वाईट व्यसने लागतात मला इथं म्हणावस वाटेल की खरोखर त्या आई - वडीलांचे मन कूठे असेल,काय  वाटत असेल त्या जन्म दात्यांना कधी आपण त्या गोष्टीचा विचार केला का,आपण आपल्या आई-वडीलांचा आधार झालो  पाहीजे त्यांना जगातील सर्व गोष्टीचा आनंद आणि फक्त आनंदच देतोय काय
 आपण आता तरी आपल्या डोक्यातील ट्युब पेटवली पाहीजे कारण त्यांनी कोणाकडे पाहुन जगायच,त्यांचे स्वप्न आपण जर एक प्रकारचे भंग केले तर आपण त्यांच्या पोटी ( उदरात ) जन्माला येऊन त्याचा उपयोग तो काय ? म्हणून विचार करा बंधू आणि मातांनो आपण हि कधी कोणाचे आई-वडील झालो तर हीच गोष्ट आपल्या  सोबत घडली,तर मग काय पश्चाताप होनार,आपण विचार करायला पाहिजे ही सत्य परिस्थिती  आपल्या समोर असेल तर आपण आपल्या आई वडीलां जवळ  बोलले  पाहिजे व आपल्या पत्नी ला सूद्धा  तेवढाच मान दिला पाहिजे तेंव्हाच तर जीवन जगण्याची कला आपल्याला कळेल.
 म्हणून मित्रहो आपण आता वाईट संगतीला असाल तर आपण लगेच त्या गोष्टीला झटकून चांगल्या कर्माकडे वळण घेऊन मध्यम मार्गाने जगलो पाहिजे. 
डाॅ बाबासाहेब आंबेडकर बोलले होते ‘वाचाल तरच वाचाल' आणि आज आपण जर हे शब्द घेतले तर आपण परीवर्तन शिल होऊ शकतो कारण शिक्षणात एवढी ताकत आहे की जे कोनी त्याला डोक्यात घेतले (त्याला प्राशन केले ) तर तो नक्किच गूरगूरल्या शिवाय राहणार नाही म्हणून आपल्या समोर *तरुणाच्या समस्या व त्यांचे निवारण" याला घेऊन येतो आहे नक्किच आपण त्यामधून बोध घ्याल अशि आशा ठेवतो*.
   *तरूण वर्गाने एकदा हे पूस्तक वाचलेच पाहीजे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सरोज मंगल सनेवडी वर्धा येथे बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा वामन मेश्राम साहेब यांच्या हस्ते २५ ऑगस्ट रोजी पार पडत आहे आपले प्रेम आणि साथ मिळेल हीच अपेक्षा.
              लेखक
*डाॅ सचिन वंदना नरेंद्र भिमकर* 
       M-*8308302207

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या